Join WhatsApp group

हातगाव ग्रामपंचायत संशयाच्या भोवऱ्यात? सुरू असलेल्या आंदोलनामुळे उघड होतोय भोंगळ कारभार!

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दि. १६ जुलै : मूर्तिजापूर (✒️प्रेमराज शर्मा)

सध्या हातगाव ग्रामपंचायत मध्ये शेतकरी संघटनेचे नेते सुरेश जोगळे यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या धरणे आंदोलनामुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष या गावाकडे वळले आहे. ग्रामपंचायतीच्या विविध मुद्द्यांवर त्यांनी थेट ग्रामस्थां समोर आणि प्रशासनासमोर आवाज उठवत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

या आंदोलनामुळे ग्रामपंचायतीच्या पूर्वीच्या निर्णय प्रक्रियेपासून आर्थिक व्यवहारांपर्यंत अनेक भोंगळ कारभार समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांतून आवाज उठू लागला आहे की, गेल्या काही वर्षांपासून ग्रामपंचायतीत पारदर्शकतेचा अभाव असून काही सदस्य आणि अधिकारी यांचे संगनमताने चुकीचे निर्णय घेतले गेले.

आंदोलन सुरू झाल्यापासून गावात चर्चांना उधाण आले असून, आगामी सहा महिन्यांत ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपणार असल्याने राजकीय वातावरणही तापले आहे. “आता ग्रामपंचायतीच्या जुन्या बॉडीशी कुणालाही काही देणं-घेणं नाही” असा सूर नागरिकांतून उमटत आहे.

नाव न घेण्याच्या अटीवर सरकार माझा न्यूजशी बोलताना एका सदस्याने सांगितले की, “या भोंगळ कारभारा मध्ये काही प्रशासकीय अधिकारी देखील सामील आहेत. लवकरच ग्रामस्थ या प्रकरणात खुलासा करतील, आणि सत्य बाहेर येईल.”

विशेष म्हणजे, या आंदोलनानंतर माहिती अधिकाराच्या (RTI) माध्यमातून अनेक अर्ज ग्रामपंचायतीवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामपंचायत व प्रशासन हे आंदोलन कोणत्या प्रकारे शांत करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!