Join WhatsApp group

आजीच्या हत्येप्रकरणी नातवाला जन्मठेपेची शिक्षा – एपीआय दिलीप पोटभरे यांच्या तपासाला सुयश

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला : किरकोळ वादातून आजीवर कुऱ्हाडीने हल्ला करून खून करणाऱ्या नातवाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच आरोपीला दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावास भोगावा लागेल.

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे १० डिसेंबर २०१९ रोजी ही खळबळजनक घटना घडली होती. नितीन मोरेश्वर राऊत (रा. राळेगाव) याने आपल्या ७० वर्षीय आजी शकुंतलाबाई राऊत यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला होता.

आजीने त्याला शेळ्या चरायला न गेल्याबद्दल फटकारले होते. संतप्त नातवाने तिच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या आजीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी मोरेश्वर राऊत यांनी राळेगाव पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिस उपनिरीक्षक दिलीप गोपीचंद पोटभरे यांच्या नेतृत्वाखाली तपास करण्यात आला. तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले.

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. यू. बघेले यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी पक्षाकडून सहायक सरकारी वकील मंगेश गंगवार यांनी ९ साक्षीदारांची साक्ष नोंदवली.

साक्षी व पुरावे अभ्यासून आरोपी नितीन राऊत याला दोषी ठरवण्यात आले आणि जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.सरकारतर्फे कायदेशीर बाजू सादर करण्यासाठी वकिली अधिकारी योगेश हरिदास वाघमोडे यांनी सहकार्य केले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!