Join WhatsApp group

महिला चोराकडून ५ लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला : अकोट शहर पोलिसांनी चोरीच्या प्रकरणात एका महिला आरोपीला अटक करून तब्बल ५ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

२ जुलै रोजी बस प्रवासादरम्यान एका महिलेकडून १३,५०० रुपये चोरी झाल्याची तक्रार ९ जुलै रोजी अकोट शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. तपासादरम्यान पोलिसांनी एक महिला आरोपी ताब्यात घेतली.

कडक चौकशीअंती, आरोपीने चार चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. तिच्याकडून रोख १२,००० रुपये आणि सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. यात गुन्हा क्रमांकानुसार खालील प्रमाणे मुद्देमाल सापडला:

१ लाख २० हजाराचे १५ ग्रॅम सोने (गु.क्र. १७३)

४ लाखाचे ४६ ग्रॅम सोने (गु.क्र. १६५)

३५ हजाराचे ४ ग्रॅम सोने (गु.क्र. ६४४)

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अति. पो. अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. अमोल साळवे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तपास पथकात पीएसआय वैभव तायडे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!