Join WhatsApp group

नगरपरिषद क्षेत्रातील मालमत्ता धारकांसाठी दिलासादायक बातमी!

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर, दि. 2 (प्रतिनिधी): नगरपरिषद क्षेत्रातील मालमत्ता धारकांसाठी दिलासादायक बातमी! मूर्तिजापूर नगरपरिषदेने थकीत मालमत्ता करावरील शास्ती व व्याजावर १०० टक्के सूट देणारी “अभय योजना” लागू केली आहे.

ही योजना माजी उपनगराध्यक्ष श्री. सुनील पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मूर्तिजापूरमध्ये राबविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत थकीत मालमत्ता करावरील दरमहा २ टक्के शास्ती व्याज पूर्णतः माफ करण्यात आले आहे.

नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता १४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. (पूर्वीची मुदत २० ऑक्टोबर होती.) त्यामुळे थकीत मालमत्ता धारकांनी दरमहा २ टक्के शास्ती/व्याजाची रक्कम वगळून थकीत कर भरता येणार आहे.

महाराष्ट्र नगरपरिषदा अधिनियमातील सुधारणा आणि शासन निर्णयानुसार ही योजना राबविण्यात आली आहे. सुट्टीच्या काळातही शासकीय सेवा उपलब्ध राहाव्यात यासाठी नगरपरिषद प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे.

माजी उपनगराध्यक्ष सुनील पवार यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की —

“या सुवर्णसंधीचा लाभ घ्या, तातडीने नगरपरिषदेच्या कर विभागाशी संपर्क साधा आणि आपला थकीत मालमत्ता कर १४ नोव्हेंबरपूर्वी भरून शास्ती व व्याज माफीचा फायदा घ्या.”

केवळ थकीत कराचा भरणा १४/११/२०२५ पर्यंत करणे आवश्यक आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!