Join WhatsApp group

गोलाम पाटलाची वरली मटक्याची पाटीलकी ग्रामीण भागात बिनधास्त सुरू – पोलिसांना थेट आव्हान?

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर : मुर्तिजापूर तालुक्यात सध्या वरली मटका अवैध जुगार व्यवसाय जोरात सुरू असून, गोलाम पाटील नावाचा मुख्य सूत्रधार या व्यवसायाचा प्रमुख चालक ठरत आहे. कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याच्या नादात गोलाम पाटील अनेकांचे कुटुंब देशोधडीला लावत आहे.

गोलाम पाटील यांचे वरली मटक्याचे साम्राज्य मूर्तिजापूर शहर तसेच मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस स्टेशन परिसरात व मुर्तीजापुर तालुका सीमेलगत कारंजा पोलीस स्टेशनच्या काही गावात तर दर्यापूरच्या पोलीस स्टेशनच्या हद्दी मध्ये सुद्धा पसरलेले आहे.

शहरापुरता मर्यादित असलेला हा मटका व्यवसाय आता ग्रामीण भागातही गावोगावी झपाट्याने पसरत आहे.

या अवैध धंद्यामधून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असून, अनेक भरकटलेले तरुण आणि वृद्ध अज्ञान नागरिक यामध्ये आतोनात गोलाम पाटील मुळे बुडत आहे.

गोलाम पाटील रतन खत्रीच्या शैलीत आपले ‘वरली मटका साम्राज्य’ ग्रामीण विभागात आपले साम्राज्य पसरवत आहे.

सध्या ‘ऑपरेशन प्रहार’ची जिल्हाभर चर्चा सुरू असताना, गोलाम पाटीलचा हा उघडपणे सुरू असलेला व्यवसाय प्रशासनाला थेट आव्हान देत असल्याचे चित्र दिसून येते.

गोलाम पाटील आपल्या एजंटा कडून व्हाट्सअ‍ॅपच्या माध्यमातून मटक्याचे आकडे घेत असून, मुर्तीजापुर बायपास राहत्या घरी व अन्य ठिकाणी गुप्त बुकिंग केंद्रे सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

नागरिकांची तीव्र प्रतिक्रिया :

गावोगावी सुरू असलेल्या या अवैध व्यवहारामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.

त्यामुळे पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.

जर ही कारवाई लवकर न झाल्यास, समाजातील अनेक कुटुंबे अंधकारात ढकलली जातील, असा प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!