Join WhatsApp group

मित्र झाले वैरी – दोन गटांमध्ये वर्चस्वाच्या वादातून तुफान हाणामारी; ८ जण जखमी

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला (दि.१७ जुलै २५):अकोल्यातील कृषी नगर परिसरात दोन गटांमध्ये वर्चस्वाच्या वादातून तुफान वाद झाला असून या वादात दोन्ही गटातील तब्बल ८ जण जखमी झाले आहेत. हाणामारी दरम्यान तलवारी व बंदुकीचा वापर झाल्याची माहिती समोर आली असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दोन मित्र आज वैरी झाल्यामुळे एवढा मोठा घटनाक्रम अकोल्याच्या कृषी नगरात घडला. अशी चर्चा शहरात रंगली आहे.

ही घटना आज रात्री सातच्या सुमारास घडली. आकाश गवई आणि संतोष वानखडे या दोन गटांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता. त्यातून वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यामध्ये गोळीबार झाल्याचीही चर्चा असून, घटनास्थळावरून एक जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केलं आहे. तसेच एक हवेत फायर झाल्याचंही सांगितलं जात आहे.

जखमी झालेल्यांमध्ये –

आकाश गवई, स्वप्नील बागडे, शुभम हिवराळे,तर दुसऱ्या गटातील सतीश वानखडे, जितू सरकटे, अंकुश क्षीरसागर, धम्मरक्षक वानखडे आणि वनमाला वानखडे यांचा समावेश आहे. सर्व जखमींवर अकोला शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, पोलीस दलाचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि श्वानपथक घटनास्थळी दाखल झालं आहे. दरम्यान, काही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत असून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

या प्रकारामुळे अकोल्यात पुन्हा एकदा गुन्हेगारी व वर्चस्व वादाचं सावट गडद झाल्याचं चित्र आहे. पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!