Join WhatsApp group

प्लास्टिक सर्जरी दिनानिमित्त मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात संपन्न

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला, दि. २१ जुलै – १९ जुलै रोजी रोटरी क्लब ऑफ अकोला नॉर्थ, अकोला जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन, श्रीराम हॉस्पिटल आणि स्माईल ट्रेन यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक सर्जरी दिनाचे औचित्य साधून भव्य मोफत तपासणी व प्लास्टिक सर्जरी शिबिर आयोजित करण्यात आले. हे शिबिर डॉ. एन. आर. सलामपुरिया मेमोरियल श्रीराम हॉस्पिटल, अमानखा प्लॉट, अकोला येथे मोठ्या उत्साहात पार पडले.

या शिबिरात जन्मजात दोषांसह – फाटलेले ओठ, दुभंगलेली टाळू, लिंगदोष (हायपोसपेडियास), चिकटलेली जीभ, जास्तीची किंवा चिकटलेली बोटे – अशा शस्त्रक्रियांची तपासणी करण्यात आली. यासोबत डायबिटिक फूट केअर, त्वचारोपण, कॉस्मेटिक सर्जरी, त्वचारोग, नखांचे विकार, केसांची समस्या, सौंदर्यसंबंधी समस्या तसेच जळाल्यानंतर झालेल्या विकृती यांच्यावर मोफत मार्गदर्शन करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शारदा सलामपुरिया यांच्या हस्ते महर्षी सुश्रुत यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. त्यांनी रुग्णांचे स्वागत करत आयोजकांचे कौतुक केले.

शिबिरात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. मयूर बी. अग्रवाल आणि त्वचारोग व सौंदर्यतज्ज्ञ डॉ. श्रद्धा एम. अग्रवाल यांनी रुग्णांची सखोल तपासणी व मार्गदर्शन केले. एकूण १५० रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यातील ३८ रुग्ण प्लास्टिक सर्जरीसाठी निवडले गेले. उर्वरित रुग्णांना आवश्यक ते उपचार व औषधे मोफत देण्यात आली.

या प्रसंगी अकोला जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सत्यनारायण बाहेती, उपाध्यक्ष रामभाऊ बिरकड, सचिव एकनाथराव उके यांनी डॉक्टरांचा सत्कार शाल, पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन केला.

कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ अकोला नॉर्थचे अध्यक्ष डॉ. श्रद्धा अग्रवाल, उपाध्यक्ष अखिलेश पारीका, सचिव प्रा. महेश बाहेती, कोषाध्यक्ष डॉ. गजानन वाघोडे यांच्यासह, सर्जिकल सोसायटीचे डॉ. रणजीत सपकाळ, डॉ. महेंद्र चांडक, डॉ. संदीप इंगळे, विदर्भ सर्जिकल सोसायटीचे डॉ. रवींद्र तेलकर आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. महेश बाहेती यांनी केले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!