Join WhatsApp group

हॉकर्स झोनसाठी बियाणीचे जीन उपलब्ध करून द्यावे – अतिक्रमण धारकांची आमदार हरीश पिंपळे यांच्याकडे मागणी

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापूर – शहरातील अतिक्रमण धारकांनी बियाणीचे जीन परिसर हॉकर्स झोन म्हणून घोषित करून तेथील जागा त्यांना व्यवसायासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार हरीश पिंपळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शहरात सध्या अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू असून त्यामुळे अनेक लहान व्यावसायिकांचे रोजगार धोक्यात आले आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. त्यामुळे या सर्व अतिक्रमणधारकांना एक ठिकाण उपलब्ध करून देऊन त्यांच्या व्यवसायाला पुन्हा चालना द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासंदर्भात अतिक्रमण धारकांच्या वतीने एक शिष्टमंडळ आमदार हरीश पिंपळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, बियाणीचे जीन परिसर हा सध्या रिकामा असून तेथे आवश्यक त्या सोयी-सुविधा करून हॉकर्स झोन उभारता येईल, जेणेकरून लहान व्यावसायिकांना पुन्हा रोजगाराची संधी मिळू शकेल.

यावेळी आमदार हरीश पिंपळे यांनी अतिक्रमण धारकांचे म्हणणे समजून घेतले असून लवकरच नगरपालिका व प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

शहरातील अनेक लहान व्यवसायिक व दुकानदार आता या मागणीवर काय निर्णय घेतला जातो, याकडे आशेने पाहत आहेत.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!