Join WhatsApp group

गतिशील टर्मिनल गतिशील अकोला – खासदार अनुप धोत्रे

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक ०८ : अकोला : गतिशील टर्मिनल अकोल्याच्या विकासाला गतिशील ठरणार व त्या संदर्भातला प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात आले आहे.

तसेच खासदारांच्या मागणीनुसार पिट लाईन चा प्रस्ताव सुद्धा पाठवण्यात आला असून व अकोला जळगाव भुसावळ रेल्वे स्टेशनचा विस्तारीकरण खासदार च्या मागणीनुसार होणार असून येत्या पंधरा दिवसात एक्सलेटर सुरू करण्यात येईल.

तसेच येणे आणि जाण्यासाठी एक्सलेटर ची सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात कारवाई करण्यात येईल तसेच पार्किंग व्यवस्था व अनेक विषयावर खासदार अनुप धोत्रे यांच्या मागणीची दखल घेऊन त्वरित सोडवण्यातील असे अभिवचन मध्य रेल्वे डी आर एम श्रीमती इदी पांडे यांनी दिले. लोकनेते संजय भाऊ धोत्रे रेल्वे प्रवाशांना अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील होते त्यांच्या प्रयत्नाला आकार स्वरूप देण्याचे काम खासदार अनुप धोत्रे करत असून अकोला रेल्वे स्टेशनचा मॉडेलिकरण करण्याची मागणी आणि त्याचा प्रस्ताव संजय भाऊ धोत्रे यांनी केंद्र सरकारकडे पाठवला होता.

त्याला अंतिम रूप देण्याचे काम सुरू असून या संदर्भात खासदार अनुप धोत्रे तुमच्या मागणीला रेल्वेमंत्री नामदार अश्विनी वैष्णव यांनी मान्यता दिली असून यासंदर्भात तुला प्रस्ताव मागवण्यात आला आहे व या संदर्भात खासदार धोत्रे यांनी रेल्वे मध्य रेल्वे डी आर एम कडे की अकोले करांच्या भावना व कसा असावा यासंदर्भात नाशिकच्या धरतीवर ई-मेल किंवा बॉक्स द्वारे सूचना मागविण्यात यावा ही मागणी मंजूर करण्यात आली आहे.

रेल्वे विभागात द्वारे या संदर्भात लवकर कारवाई करून अकोला रेल्वे स्थानक कसा असावा यासंदर्भातला प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे तसेच अकोट फाईल कडे जाणाऱ्या रस्ते रेल्वे पुलाची मुदत संपत असून त्या संदर्भात नवीन पूल निर्माण करण्याचा व त्याचं नवीनीकरण करणे दुरुस्ती करणे संदर्भातला प्रस्ताव येत्या दोन एक महिन्यात रेल्वे विभागाकडे पाठवण्यात येणार आहे.

तसेच मुर्तीजापुर येथे रेल्वे पूल निर्माण करण्याच्या सूचना खासदार धोत्रे यांनी दिला होते त्या संदर्भात सुद्धा सर्वे करून त्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्राकडे पाठवण्यात येईल असे अभिवचन डी आर एम यांनी दिले तसेच येत्या पंधरा दिवसात एक्सीडेंट सुरू करण्यात येईल व जनतेला सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

तसेच रेल्वे स्थानकावर सायकल स्टॅन्ड व कार पार्किंग येथे रेड बोर्ड लावण्याचा सूचना देण्यात आले आहे. नवीन गाड्या सुरू करण्यासाठी खासदार धोत्रे यांनी आपल्या वचननाम्यामध्ये दिली होती त्यानुसार त्यांना कामाला सुरुवात केली असून पीट, लाईन संदर्भातला प्रस्ताव मध्य रेल्वे डी आर एम यांनी रेल्वे मंत्रालयाकडे पाठवला असून यासंदर्भात आपण पाठपुरावा करून अकोलेकरांना दिलेली वचनपूर्ती आपण करू असे यावेळी खासदार धोत्रे यांनी सांगितले.

तसेच अकोला रेल्वे स्थानकाचा विस्तार करण व नवीन गाड्या अमृत योजनेअंतर्गत मूर्तिजापूरच्या कामाच्या संदर्भात गती देण्याची मागणी खासदार धोत्रे यांनी केली तसेच वेगवेगळ्या गाड्या थांबा या संदर्भात सुद्धा त्यांनी मागणी करून त्यांचे लक्ष वेधले अनेक सूचना देऊन त्यात पूर्तता करण्याचे अभिवचन दिले असून अकोला शहराच्या विकासाला व महाराष्ट्रातला गतिशील टर्मिनल रेल्वे स्टेशन बनवण्याच्या दृष्टीने प्रस्ताव सादरीकरण करण्यात आला असून त्याचं काम सुरुवात झाल्यास अकोला रेल्वे स्थानक हा महाराष्ट्रात एक नंबरचा रेल्वे स्टेशन होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी खासदार धोत्रे यांच्यासोबत वसंत बाछुका, गिरीश जोशी उन्मेश मालू, पवन महल्ले, माधव मानकर जयंत मसने विजय अग्रवाल मोहन पारधी, राहुल देशमुख, एडवोकेट देवाशिष काकड आदी प्रामुख्याने उपस्थित होते.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!