Join WhatsApp group

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या खेळाडूची राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी!

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक २१ – अकोला – महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या विकासात क्रीडा प्रकार महत्त्वाची भूमिका बजावतात, ज्यामुळे शारीरिक, मानसिक आरोग्य सुदृढ होण्यासाठी फायदे मिळतात. नित्य शारीरिक व्यायाम व खेळातील सहभाग हे मानसिक आरोग्यात योगदान देतात, सामाजिक कौशल्ये वाढवतात आणि टिमवर्क आणि नेतृत्व यासारख्या मौल्यवान जीवन कौशल्यांना प्रोत्साहन देतात. एकाग्रता, वेळ व्यवस्थापन आणि ताण कमी करून शैक्षणिक यशातही खेळ महत्त्वाची भूमिका बजावतात.
आचार्य नरेंद्रदेव कृषी विद्यापीठ,अयोध्या द्वारे दि. 2 ते 5 मे 2025 या कालावधीत अखिल भारतीय अंतर कृषी विद्यापीठ क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेमधे भारतातील एकूण 51 कृषी विद्यापीठांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेमधे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या 26 खेळाडू व 2 संघव्यवस्थापक यांनी सहभाग नोंदवाला. उल्लेखनीय म्हणजे या स्पर्धेदरम्यान ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत विद्यापीठा अंतर्गत श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय, शिर्ला अंधारे या कृषि महाविद्यालयात शिकत असलेला विद्यार्थी धनंजय खाडे याने रौप्य पदक पटकावले. विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ.शरद गडाख यांनी धनंजयचे भरभरून कौतुक केले तसेच धनंजयने केलेल्या कामगिरी बद्दल अधिष्ठाता (कृषी)डॉ. श्यामसुंदर माने, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. संदीप हाडोळे व क्रीडा अधिकारी डॉ. रोहित तांबे तसेच विद्यार्थी कल्याण कार्यालयातील श्रीमती मंजुषा देशमुख व संजय बोबडे यांनी धनंजय खाडे यांचे कौतुक केले. विद्यापीठाच्या लौकिकात अजून भर पडल्याने आनंदाचे वातावरण आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!