Join WhatsApp group

रुग्णसेवेला आयुष्य अर्पण करणारे डॉ. गौरव गोसावी यांचे वयाच्या ४० व्या वर्षी निधन

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर |दिनांक १८: मुर्तीजापुर येथील शासकीय रुग्णालयात यापूर्वी सेवा बजावलेले कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी स्व. डॉ. गौरव गोसावी यांचे वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.

त्यांच्या अकाली जाण्याने मुर्तिजापूर शहरासह संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.स्व. डॉ. गौरव गोसावी यांनी आपल्या सेवाकाळात मुर्तिजापूरच्या शासकीय रुग्णालयात अत्यंत प्रामाणिकपणे व निष्ठेने रुग्णसेवा केली. शासकीय आरोग्य यंत्रणेतील अडचणी असूनही त्यांनी रुग्णसेवेला कधीही दुय्यम स्थान दिले नाही.

आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी धावून जाणे, गरीब व गरजू रुग्णांवर माणुसकीच्या भावनेने उपचार करणे आणि रुग्णांचे मनोबल वाढवणे, हे त्यांच्या सेवाकार्याचे ठळक वैशिष्ट्य होते.डॉ. गोसावी हे रुग्णांशी आपुलकीने संवाद साधणारे, सहकाऱ्यांना मार्गदर्शन करणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या उपचारांमुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळाला असून आजही अनेक कुटुंबे त्यांना कृतज्ञतेने आठवत आहेत.

त्यांच्या अकाली निधनामुळे वैद्यकीय क्षेत्रात व सामाजिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीय, आप्तस्वकीय, मित्रपरिवार तसेच असंख्य रुग्ण असा मोठा परिवार आहे.ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती देवो व या दुःखाच्या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना धैर्य व बळ देवो,

अशी भावना मुर्तिजापूर शहरातून व्यक्त होत आहे.भावपूर्ण श्रद्धांजली… 💐💐💐💐


Share

Leave a Comment

error: Content is protected !!