Join WhatsApp group

मूर्तिजापूर शहरातील वरलीवाल्याकडे अडकले ग्राहकांचे लाखो रुपयांचे व्यवहार – लोहकपुरेवर संतापाचा सूर

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर (दि:१७ जुलै)शहरातील लोहकपुरे नावाचा व्यक्ती छुप्या पद्धतीने वरली मटक्याचा अवैध व्यवसाय चालवत असल्याची माहिती असून, सध्या त्याच्या व्यवहारात मोठा तोटा झाल्याने अनेक ग्राहकांचे हजारो-लाखो रुपयांचे व्यवहार अडकले आहेत. त्यामुळे या प्रकरणावरून शहरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

ग्राहकांनी वेळोवेळी आपले पैसे मागितले असता, लोहकपुरे त्यांच्याशी अरेरावीची भाषा वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. “जिथे जायचं असेल तिथे जा, माझं काही वाकडं करू शकत नाही,” असा उद्धट पवित्रा त्याने घेतल्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप आहे.

🧾 मटका डिजिटल… पोलिसही हतबल

वरली मटका हा अवैध व्यवसाय असला तरी चिट्टीला (नंबर) अधिक महत्त्व दिले जाते. सध्या हा सगळा व्यवहार डिजिटल माध्यमांतून होत असल्याने पोलीस यंत्रणेलाही व्यवहार ट्रॅक करणे कठीण झाले आहे. मोबाइल अॅप्स, कोड व ऑनलाइन व्यवहारांमुळे या धंद्याला नवे रूप मिळाले असून, कारवाईस अडथळे येत आहेत.

🗣️ लोहकपुरेवर कारवाईची मागणी

शहरातील अनेक नागरिक व ग्राहकांनी लोहकपुरेवर त्वरित कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. हा व्यवसाय केवळ अवैध नसून, अनेक कुटुंबांचे आर्थिक नुकसान करणारा आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

📌 लोहकपुरेचे मुख्य मुद्दे:

ग्राहकांचे लाखो रुपये अडकले

लोहकपुरेचा उद्धटपणा

पोलिसांच्या दृष्टीने लोहपुरेची ट्रॅकिंग कठीण

डिजिटल माध्यमांतून लोहकपुरेचा व्यवसाय

नागरिकांची लोहपुरेवर कायदेशीर कारवाईची मागणी

सध्या मूर्तिजापूरमध्ये “लोहकपुरेवर कोण आळा घालणार?”

हा प्रश्न चर्चेचा विषय ठरत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!