Join WhatsApp group

Crime News : स्वतःच्या आईसोबतच अनैतिक संबंध, लेकीनं बापाला आजीसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं अन्….

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक २५ : बापानेच खून करून शेतातील वस्तीसमोरच लेकीला पुरल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी उघडकीस आला होता. स्वतः बापाने आपणच मुलीची हत्या केल्याची कबुली दिली होती. याप्रकरणी आता एक अतिशय किळसवाणी आणि संतापजनक बाब समोर आली आहे. आरोपी बापाला त्याच्या सख्ख्या आईसोबत मुलीने नको त्या अवस्थेत पाहिले. आणि आपलं घाणेरडं कृत्य मुलीने कोणाला सांगू नये म्हणून बापाने मुलीचा खून केला.

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर येथे जन्मदात्या बापानेच आठ वर्षाच्या मुलीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. बापानेच खून करून शेतातील वस्तीसमोरच लेकीला पुरल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी उघडकीस आला होता. स्वतः बापाने आपणच मुलीची हत्या केल्याची कबुली दिली होती. याप्रकरणी आता एक अतिशय किळसवाणी आणि संतापजनक बाब समोर आली आहे. आरोपी बापाला त्याच्या सख्ख्या आईसोबत मुलीने नको त्या अवस्थेत पाहिले. आणि आपलं घाणेरडं कृत्य मुलीने कोणाला सांगू नये म्हणून बापाने मुलीचा खून केला.

याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, आरोपी ओगसिद्ध रेवणसिद्ध कोठेचे ( वय ३४) कुटुंब शेतातील वस्तीवर राहते, ओगसिद्ध याला तीन मुली आणि एक मुलगा आहे. त्याच्या पत्नीला सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, एक मुलगा आणि दोन मुली गावातच आजोळी मुक्कामी गेल्या होत्या. मयत मुलगी आजोबा रेवणसिद्ध यांच्या जवळ झोपली होती. उशिराने ती दुसऱ्या खोलीत झोपलेल्या वडिलांकडे गेली. परंतु त्यावेळी तीने स्वतःच्या बापाला आजीसोबत(आरोपीची सख्खी आई) शरीर संबंध ठेवताना पाहिले. बिथरलेल्या ओगसिद्धने मुलीने कोणाला याबद्दल सांगू नये म्हणून रात्रीच तिचा गळा दाबून खून केला. आणि घराशेजारी खड्डा खणून तिला पुरून टाकले.

दुसऱ्या दिवशी सकाळी आजोबांनी आणि नातलगांनी मुलीचा गावात शोध घेतला. गावातील नातलग वस्तीवर जमले. घराशेजारी खड्ड्यातील माती, चिखलात उमटलेली पावले पाहून नातलगांना संशय आला. आणि ग्रामस्थांनी त्याबाबत मंद्रूप पोलिसांना माहिती दिली. नातलगांनी विचारले असता, वडिलांनी मी स्वतः रात्री तिचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली. वडिलांनी नातलगांसमोर दिलेली माहिती मंद्रुप पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी खड्डा उकरून मुलीचा मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयाकडे पाठवला.

पोलिसांनी चौकशी केली असता सुरुवातीला आरोपी ओगसिद्धने खरी बाब सांगण्यास टाळाटाळ केली. परंतु पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने मुलीला का मारले याची खरी हकीगत सांगितली. या प्रकरणी आरोपीच्या पत्नीनेही पोलिसांना आरोपीचे स्वतःच्या आईशी असलेल्या अनैतिक संबंधाबाबत माहिती दिली.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!