Join WhatsApp group

मुर्तीजापुरात काँग्रेसचा ‘राजकीय श्वास’ युतीवर अवलंबून! खंबीर उमेदवार मिळेना?

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापुर : ११ नोव्हे.२५ : मुर्तीजापुर शहरात नगरपरिषद निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी मैदानात तयारी सुरू केली असताना, काँग्रेस पक्ष मात्र अद्याप उमेदवार शोध मोहिमेत अडकलेला दिसत आहे. शहरात काँग्रेसचे नाव असले तरी प्रभाव नाही, आणि पदाधिकारी असले तरी कृती नाही, अशी टीका कार्यकर्त्यांतूनच सुरू झाली आहे.

एकेकाळी शहरात काँग्रेसचा झेंडा जोमात फडकायचा, पण आज तो झेंडा फोटोशूटपुरता मर्यादित झाल्याची कटू चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काही मोजके कार्यकर्ते सोशल मीडियावर ‘भावी नगरसेवक’ असा टॅग लावून प्रसिद्धी मिळवत आहेत, पण प्रत्यक्ष जनतेमध्ये त्यांचा ठसा उमटताना दिसत नाही.

भाजप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी निवडणुकीसाठी तयारीला सुरुवात केली आहे, तर काँग्रेस मात्र गोंधळात. पक्षात नेतृत्वाचा अभावा मुळे काँग्रेसचे अस्तित्व संकटात आले आहे.

तथापि, महाविकास आघाडीत (युतीत) राहिल्याने काँग्रेसला थोडासा राजकीय ऑक्सिजन मिळाला आहे. उद्धव सेना आणि राष्ट्रवादीकडून मिळणाऱ्या या साथीतूनच पक्षाचे अस्तित्व सध्या टिकून असल्याचे मानले जाते. स्थानिक पातळीवर मात्र काँग्रेसची संघटनात्मक शक्ती जवळजवळ शून्य असल्याची कबुली अनेक माजी पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

काँग्रेसचा पारंपरिक मतदार वर्गही आता इतर पक्षांकडे वळत असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे शहरात चर्चा सुरू आहे की,
“युतीच्या मदतीशिवाय काँग्रेसचा दिवा पुन्हा पेटेल का, की मुर्तीजापुरात इतिहासजमा होईल?”



Share

Leave a Comment

error: Content is protected !!