Join WhatsApp group

काँग्रेस आमदार साजिद खान पठाण हतबल; खोटी प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न?

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला : विकासकामांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या लोकप्रतिनिधींनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे जनतेचा विश्वास अधिक बळकट झाला आहे. केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजना मंजूर करून घेण्यात आणि निधी आणण्यात भाजपाचे लोकप्रतिनिधी यशस्वी ठरत असताना काँग्रेसचे आमदार मात्र खोटी प्रसिद्धी मिळवण्यासाठी धडपड करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

अकोट रेल्वे पुलाच्या संदर्भात आज काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी प्रसिद्धी पत्रक काढून आपण विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्यामुळे हा प्रस्ताव मंजूर झाल्याचा दावा केला आहे. मात्र, या दाव्यावरून त्यांची राजकीय हतबलता आणि दिशाभूल करणारे सल्लागार यांची स्पष्ट झलक दिसते.

खासदार अनुप धोत्रे यांनी हा प्रश्न केंद्र सरकारकडे पाठवून, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मध्य रेल्वेच्या सल्लागार समितीत हा मुद्दा मांडण्यात आला आणि त्यानंतर तांत्रिक मान्यता मिळवून पुढील प्रक्रिया सुरू झाली. हे वृत्त माध्यमांतून प्रसिद्ध झाल्यानंतर काँग्रेस आमदारांनी झोपेतून जाग येऊन श्रेय लाटण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

खोट्या प्रसिद्धीच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न हास्यास्पद असून, काँग्रेस आमदारांचा हा प्रकार “दूध खुळे” समजुतीचा असल्याचे भाजप समर्थकांनी म्हटले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!