Join WhatsApp group

जनसामान्य नागरिकांना त्रास होवू देणार नाही: आमदार रणधीर भाऊ सावरकर

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक : १५ : अकोला : ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहता कामा नये त्यांना कोणती अडचण येणार नाही .

वंचित बहुजन आघाडीच्या कारभाराचा फटका ग्रामीण भागाला जनतेला बसू नये यासाठी जिल्हा परिषद च्या यंत्रणेला उन्हाळ्यातील दिवस लक्षात घेता वीज वितरण कंपनी यांची दयक संदर्भात ताबडतोब जिल्हा प्रशासन व राज्य शासन व जिल्हा परिषद प्रशासनाने लक्ष द्यावे अशा सूचना भाजपा प्रदेश सरचिटणीस व विधिमंडळ प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांनी दिल्या.

खारपारपट्ट्यातील ६०गावे, ४ गावे तसेच ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेचा पाणी पुरव आठठा खंडित करून नागरिकांना वेठीस धरू नये, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांना आमदार रणधीर सावरकरांनी स्पष्ट केले,जिल्हा परिषदेकडे असलेल्या पाणी पुरवठा थकबाकीमुळे खारपाण पट्ट्यातील ६० गावे, ४ गावे व ८४ गावे पाणी पुरवठा दि. १५फेब्रुवारी पासून बंद करण्यात येणार आहे.

या करीता महाराष्‍ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ मधील भाग-६ प्रकरण १, कलम ४९ (ज) मधील तरतुदीनुसार पाणी पुरवठा बंद करणे बाबतची नोटीस कार्यकारी अभियंता, अकोला पाटबंधारे विभाग, अकोला यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांना बजावली आहे,

बजावण्‍यात आलेली नोटीस जा.क्र. ८२७/व्‍य-३/२०२५ दिनांक ५/२/२०२५ अशी आहे,सदर नोटीस नुसार दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पाटबंधारे भखात्‍याची ९८७.७९ लक्ष रूपये थकबाकी जमा करावी अन्‍यथा काटेपूर्णा/वान प्रकल्‍पाचे जलाशयातून होणारा ६० खेडी प्रादेशिक ग्रामिण पाणी डपुरवठा योजना, ४ खेडी प्रादेशिक ग्रामिण पाणी पुरवठा योजना तसेच ८४ खेडी प्रादेशिक ग्रामिण पाणी पुरवठा योजनांचा पाणी पुरवठा बंद करण्‍यात येईल असे कळविण्‍यात आलेले आहे.

जिल्‍हा परिषदेकडून पाटबंधारे विभागाची थकबाकी अदा न केल्‍यामुळे ग्रामिण भागातील प्रामुख्‍याने खारपान पट्यातील पिण्‍याच्‍या पाणी पुरवठा बंद झाल्‍यास जनजिवन विस्‍कळीत होईल तसेच पर्यायाने ग्रामिण भागातील लोकांना पर्यायी पाणी पुरवठा करण्‍याची जबाबदारी यामुळे आपल्‍या विभागावर येणार असल्‍याने याबाबत आपण संवेदनशीलतेने विचार करून सदर थकबाकी अदा करण्‍याविषयी पाटबंधारे विभागासोबत समन्‍वयातून संपर्क साधून कोणत्‍याही परिस्‍थीतीत ग्रामिण पाणी पुरवठा बाधीत होणार नाही याची काळजी घ्‍यावी.

असे आमदार रणधीर सावरकरांनी दोन्ही विभागांना बजावले आहे, खारपान पट्यातील पाण्‍याचे दुर्भीक्ष तसेच वाढते तापमान व आगामी उन्‍हाळा लक्षात घेता पाणी टंचाई निर्माण होणार नाही हे लक्षात घ्‍यावे तसेच वर नमुद केलेल्‍या पाणी पुरवठा योजनांचे नुतनीकरणाचे काम सुरू असल्‍याने आधीच या भागातील पाणी पुरवठा अंशतः बाधीत असल्‍याने लोकांना पिण्‍याचे पाणी पुरवठ्याचा सामना करावा लागत आहे, ही बाब सुध्‍दा लक्षात घ्‍यावी. असे रणधीर सावरकरांनी कळविले आहे.

जिल्‍हा परिषदेकडून पाणी पुरवठ्याची थकबाकी पाटबंधारे खात्‍यास अदा न केल्‍यामुळे सदरची परिस्‍थीती उद्भवली आहे, असे जाणीवपूर्वक आपल्‍या लक्षात आणून दिले,मु.का.अ. यांनी पाटबंधारे विभागासोबत समन्‍वयातून तातडीने संपर्क साधून थकबाकीचा पाटबंधारे खात्‍याची थकबाकी अदा करण्‍याचा प्रश्‍न निकाली काढावा तसेच पाटबंधारे खात्‍यास थकबाकी अदा करण्‍यात येईल याबाबत शाश्‍वती देवून अथवा थकबाकी अदा करावी कोणत्‍याही परिस्‍थीतीत पाणी पुरवठा बंद करून नये असे पाटबंधारे खात्‍यास कळविण्‍यात आले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!