Join WhatsApp group

मुर्तीजापूर रेल्वे स्थानकावर तिकीट एजंटांमध्ये हाणामारी, तत्काळ तिकीट साठी प्रवासी त्रस्त – रेल्वे पोलिसांनी समजूत काढून दाबले प्रकरण

Photo of author

By Sarkarmzanews

Share

काही रेल्वे अधिकार्यांचा आशीर्वादाने सुरु आहे तिकीट बुकिंगचा काळा बाजार

दिनांक : २९ जून २५ :

मुर्तीजापूर (जि. अकोला):
मुर्तीजापूर रेल्वे स्थानकावर शनिवारी सायंकाळी तिकीट खिडकीवर क्रमांक लावण्याच्या कारणावरून दोन तिकीट एजंटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेमुळे काही वेळेसाठी रेल्वे स्थानक परिसरात व प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. मात्र, रेल्वे पोलिसांनी समजूत काढून प्रकरण दाबले प्रकरण दाबून टाकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यामुळे विविध चर्चाना उधान आला आहे.

सायंकाळी सुमारे ८ वाजेच्या सुमारास रेल्वे तिकीट बुकिंग काउंटरवर एजंटांकडून क्रमांक लावण्यावरून.दोन एजंटांमध्ये वाद सुरू झाला आणि थोड्याच वेळात वाद हाणामारीपर्यंत गेला. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, काही एजंट बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात तिकीट आरक्षण करतात आणि सामान्य प्रवाशांना योग्यवेळी तिकिटे मिळत नाहीत.

रेल्वे पोलिसांनी ते थांबवले व प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एजंटांवर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

सामान्य प्रवासी म्हणतात:

“आम्हाला तिकीट मिळवण्यासाठी रांगेत तासन् तास थांबावे लागते. एजंटांनी बुकिंग काउंटरजवळ अघोषित दादागिरी चालवलेली आहे, आणि पोलिसही त्यांच्याच बाजूने दिसतात,” – एका प्रवाशाचे मत.

रेल्वे प्रशासनाची भूमिका संशयास्पद:
या प्रकाराबाबत रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दरम्यान, काही नागरिकांनी याबाबत लेखी तक्रार करण्याची तयारी दर्शवली आहे.


तपास आणि कारवाईची मागणी:
मुर्तीजापूर शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी एजंटांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, प्रवाशांच्या तत्काळ तिकीटकची जबाबदारी रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने घ्यावी, अशीही मागणी पुढे येत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!