Join WhatsApp group

बार्शीटाकळी येथे मोठ्या भाजप नेत्यांचा नेतृत्वात सिंदूर ऑपरेशनच्या विजयाचा जल्लोष!

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक १८ – बार्शीटाकळी – पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने राबवलेले ऑपरेशन सिंदूर हे अत्यंत यशस्वी ठरले. या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष काल बार्शिटाकळी येथे भव्य वाहन रॅलीच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.

या भव्य वाहन रॅलीत देशभक्तांची हिंदूस्थान प्रति देशप्रेमाची ऊर्जा पाहायला मिळाली!

या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्या जनसंपर्क कार्यालय, बार्शिटाकळी येथे नवनिर्वाचित अकोला जिल्हाध्यक्ष श्री.संतोष शिवरकर यांचा सत्कार माझ्या व खासदार मा.श्री.अनुप संजयजी धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी गुणवंत विद्यार्थी, आजी-माजी सैनिक, बार्शिटाकळी येथील नवनिर्वाचित मंडळाध्यक्ष श्री.गोपाल महल्ले व श्री.संकेत राठोड (ग्रामीण) यांचे सुद्धा सत्कार करण्यात आले.

या भव्य रॅलीत व सत्कार समारंभात माझ्यासमवेत मा.खासदार श्री अनुप संजयजी धोत्रे, श्री.संतोष शिवरकर, श्री.राजू पाटील काकड, श्री.गोपाल महल्ले, श्री.संकेत राठोड, जिवाभावाचे कार्यकर्ते आणि बार्शिटाकळी समस्त जनतेने उत्स्फूर्त सहभाग घेतला.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!