Join WhatsApp group

कॅप्टन गोगो : अकोला जिल्ह्यात ‘नशेचा’ नवा चेहरा? किशोरवयीन मुलं बनत आहे ‘वर्जिन पेपर’चे ग्राहक, पोलिस प्रशासन झोपेत?

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला |प्रेमराज शर्मा| दिनांक २४ जुलै २५

तुमचा मुलगा, भाऊ किंवा घरातील कोणी सदस्य अलीकडेच शांत, एकलकोंडा व स्वतःतच गर्क वाटत असेल, तर सावध व्हा. कारण तुमच्या घरात कुठे ‘कॅप्टन गोगो’ नावाचा नवा नशेचा सुळसुळीत मार्ग प्रवेश करत तर नाही ना?

पहायला गेले तर हा कॅप्टन गोगो फक्त एक बारीक कागद वाटतो. पण याच बारीक कागदामध्ये आजच्या तरुणाईचा भवितव्य अडकले आहे. भांग, चरस, गांजा, अफू व स्मॅक यांसारखी अंमली द्रव्यं या बारीक कागदांमध्ये भरून ‘सिगारेट’प्रमाणे ओढली जात आहेत.

किशोरवयीन मुलं आणि तरुण वर्ग बनले मोठे ग्राहक

१४ ते २० वर्षे वयोगटातील मुले या ‘वर्जिन पेपर’चा मोठ्या प्रमाणावर वापर करत असल्याने या वयातच मुलं नशेच्या गर्तेत अडकत असल्याने चिंता वाढली आहे.

दुकानदारांकडून गुप्त विक्री

या कागदांची विक्री खुलेआम न होता गुप्तपणे होत आहे. ‘केवळ मागणी’ आल्यासच हे कागद दिले जातात. सरकार माझा न्यूजने केलेल्या गुप्त चौकशीत असे अनेक दुकानदार समोर आले ज्यांच्याकडे कॅप्टन गोगो, ओसीबी (OCB), वर्जिन पेपर अशा विविध विदेशी कागदांच्या ब्रँड्स सहज मिळत आहे.

पॅकिंग आणि उपयोग

पीळसर रंगाच्या पॅकमध्ये दोन बारीक व एक जाडसा कागद असतो. बारीक कागदामध्ये नशा भरली जाते, तर जाड कागदाचा ‘फिल्टर’ म्हणून उपयोग होतो. कागदाच्या टोकांवर गोंद लावलेली असल्यामुळे तो सहज चिकटतो.

पोलिस प्रशासनाला लक्ष देण्याची गरज?

आज अकोला जिल्ह्यात हे कागद अगदी सहज मिळत आहेत, आणि अकोला जिल्ह्यातही अशीच स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‘ऑपरेशन उडान’ अंतर्गत अकोला जिल्हा पोलीस प्रशासनाने अशा बोगस नशेच्या पुरवठादारांवर कारवाई करणार का?

पान टपऱ्या, किराणा दुकाने व स्टेशनरीवर नजर ठेवून हे ‘वर्जिन पेपर’ विकणाऱ्या दुकानदारांवर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे, नाहीतर अकोला जिल्ह्यांची तरुण पिढीचे उडता पंजाब होण्यासाठी वेळ लागणार नाही.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!