Join WhatsApp group

बसचा अपघात; जीवितहानी टळली, विर भगतसिंग बचाव पथकाचे तत्पर मदतकार्य

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक २९ जून २५ :

कुरणखेड (योगेश विजयकर,प्रतिनिधी):
बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील कोळंबी फाट्यावर आज सकाळी सुमारे १०.२० वाजता नागपूरहून शेगावकडे जाणाऱ्या खासगी बस (क्रमांक एम.एच.४० ए.क्यु.६१५८) ला अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट महामार्गावरील सुरक्षा भिंतीवर जाऊन धडकली.

या बसमध्ये एकूण १७ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बसचालक वैभव मेहरे हे जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच विर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे सदस्य योगेश विजयकर, विजय माल्टे, अजय माल्टे व स्थानिक सामाजिक कार्यकर्ते योगेश खांदेल यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

जखमी चालकाला ॲम्बुलन्सच्या मदतीने मुर्तीजापुर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी दाखल झालेल्या बचाव पथकाने परिस्थिती नियंत्रणात आणत महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

या अपघाताबाबत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे संबंधित अधिकारी तसेच बोरगाव मंजू पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!