Join WhatsApp group

दिरानेच केले वहिणीचे विनय भंग – 24 तासात महिलेवर झालेल्या अत्याचाराचा तपास पूर्ण करून आरोपीसह दोषारोप पत्र न्यायालयात दाखल

Photo of author

By Sarkarmzanews

Share

ऑपरेशन प्रहार अंतर्गत पोलीस स्टेशन पिजर, यांनी 24 तासात महिलेवर झालेल्या अत्याचाराचा तपास पूर्ण करून आरोपीसह दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले.

दिनांक २१ जून २५ : पोलीस स्टेशन पिजर येथे तक्रारदार महिला वय 35 वर्षे, रा. पातुर नंदापुर ता. बार्शिटाकळी, जि. अकोला. यांनी दि. 20/06/2025 रोजी तक्रार दिली की. फिर्यादी ही दि. 18/06/2025 रोजी दुपारी 01.00 वाजता त्यांच्या घरामध्ये जेवण करून बीमार असल्यामुळे डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या खात असताना फिर्यादीचा दिर गुन्ह्यातील आरोपी नामे दीपक भगत वय 35 वर्ष हा मटणाची भाजी देण्याच्या कारणावरुन फिर्यादीचे घरात येऊन फिर्यादी पीडित हिला वहिनी तुम्ही पहिल्यासारखा सुंदर दिसत नाहीत असे म्हणून दीड तास पाठीमागून मिठी मारून पीडिता हिची छाती दाबून विनयभंग केला म्हणून प्राप्त तक्रारीवरून पोलीस स्टेशन पिंजर येथे आप न. 178/25 कलम 74,79,333.BNS प्रमाणे गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याची माहिती वरिष्ठांना दिली.

सदर गुन्ह्याचे तपासा बाबत मां. पोलीस अधिक्षक श्री अर्चित चांडक साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे सा. मा. सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री अनमोल मितल साहेब. यांचा मार्गदर्शनात गुन्हेगारावर वचक बसावा याकरिता चालवीत असलेल्या प्रहार अभियान अंतर्गत तात्काळ घटनास्थळावर जाऊन घटनास्थळ पंचनामा केला.

पंचनामा करणे करिता E साक्ष अॅप वापर करून घटनेतील साक्षीदारांचे जबाब नोंदवून, तात्काळ आरोपी नामे दीपक केशव भगत वय 36 वर्ष राहणार पातुर नंदापूर यास ताब्यात घेऊन. सदर गुन्ह्याचा 24 तासांचे आत तपास पूर्ण करून. आरोपीसह दोषारोप पत्र मा. JMFC कोर्ट बार्शीटाकळी येथे दाखल केले.

कोर्ट केस क्रमांक 126/2025 आहे. तसेच सदर खटला शीघ्र गतीने चालविण्यास मा. न्यायालयास विनंती केली आहे. सदरची कारवाई पो.स्टे. पिंजर ठाणेदार गंगाधर दराडे, ASI 1191 चव्हाण HC.234 प्रदीप धामणे, PC 427 नरहरी देवकते. WPC 2445 सोमीना राठोड, चालक HC 426 नागेश दंदी यांनी केली आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!