Join WhatsApp group

नोंद बदलण्यासाठी दहा हजारांची लाच; पटवारी व सहकारी एसीबीच्या जाळ्यात

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड भाग 2 मध्ये कार्यरत असलेला ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) विनोद बापुराव आढे आणि त्याचा वैयक्तिक सहाय्यक प्रमोद गुलाबराव इंगळे यांना लाच मागण्याच्या आरोपाखाली अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

एक शेतकरी आपल्या मालकीच्या हिवरखेड येथील प्लॉटची ऑनलाईन नोंद करून देण्याच्या मोबदल्यात तलाठी विनोद आढे आणि त्याचा ऑपरेटर प्रमोद इंगळे यांनी १५,००० रुपयांची लाच मागितली होती.

याबाबत शेतकऱ्याने ३ जुलै २०२५ रोजी अकोला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने ४ जुलै रोजी प्राथमिक पडताळणी करण्यात आली. यावेळी दोघांनी तडजोड करत लाच रक्कम १०,००० रुपये घेतल्याचे स्पष्ट झाले. प्रमोद इंगळे याने ही रक्कम स्विकारली असून त्यामागे तलाठ्याचा स्पष्ट पाठिंबा असल्याचे निष्पन्न झाले.

कारवाईचा २३ जुलै २०२५ रोजी पंचासमक्ष सापळा रचण्यात आला. दरम्यान, प्रमोद इंगळे याने तक्रारदाराकडून १०,००० रुपये घेतले आणि त्याच क्षणी अकोला एसीबीच्या पथकाने दोघांनाही ताब्यात घेतले.

सध्या हिवरखेड पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कारवाईत सहभागी अधिकारी:

या कारवाईत अकोला एसीबीचे पोलीस उपअधीक्षक मिलिंद बहाकर, पोलीस निरीक्षक प्रविण वेरूळकर, अतुल इंगोले, तसेच अंमलदार श्रीकृष्ण पळसपगार, डिगांबर जाधव, अभय बावस्कर, संदीप ताळे, प्रदिप गावंडे व चालक नफीज शेख यांचा समावेश होता.

ही कारवाई अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्यासह वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!