Join WhatsApp group

ब्रेकिंग न्यूज: ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी; अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला : दिनांक १८ : अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाला ई-मेलद्वारे बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याने आत्ताचा घडीला प्रशासन आणि पोलिस यंत्रणेत एकच खळबळ उडाली. अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.

धमकीचा ई-मेल प्राप्त होताच तात्काळ सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालय खाली करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस, बॉम्ब शोध व नाशक पथक (BDDS) तसेच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी सध्या उपस्थित आहे.

कार्यालय परिसरात सखोल तपासणी करण्यात येत असून, नागरिक व कर्मचाऱ्यांना सुरक्षित अंतरावर हलवण्यात येत आहे.प्राथमिक तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसली तरी खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण परिसराची बारकाईने तपासणी सुरू आहे.

सदर ई-मेल कुठून पाठवण्यात आला, याचा शोध घेण्यासाठी सायबर पोलिसांकडून तपास केला जात आहे.

या प्रकरणी अकोला पोलिसांकडून सध्या अधिकृत माहिती प्राप्त झाली नाही पण जिल्हा अधिकारी कार्यालयात सध्या धावपळीचे वातावरण दिसत आहे.

अफवा न पसरवता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!