Join WhatsApp group

मूर्तिजापुरात पक्षशिस्त मोडणाऱ्यांवर भाजपची कठोर कारवाई, कमलाकर गावंडे सहा तीन पदाधिकाऱ्यांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला : दिनांक १५ : पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात प्रचार करणे, पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी होणे तसेच पक्षाच्या विचारधारेशी गद्दारी केल्याचा ठपका ठेवत भारतीय जनता पक्षाने मूर्तिजापूर येथील चार पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली आहे.

जिल्हा भाजप अध्यक्ष संतोष शिवरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कमलाकर गावंडे, अमोल पिंपळे, श्रीकांत रामेकर व नितीन भटकर यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केल्याची माहिती दिली.

हकालपट्टी करण्यात आलेल्यांमध्ये

कमलाकर गावंडे – मंडळ कार्यकारिणी उपाध्यक्ष

अमोल पिंपळे – भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ,

श्रीकांत रामेकर – भाजप युवा मोर्चा मंडळाध्यक्ष

नितीन भटकर – नमामी गंगे अभियान प्रमुख

यांचा समावेश आहे.

यापूर्वी तेल्हारा, अकोट व बाळापूर येथील बंडखोर पदाधिकाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर आता मूर्तिजापुरातही भाजपने कठोर भूमिका घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

पक्षशिस्त मोडणाऱ्यांना कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून भाजपने दिला आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!