Join WhatsApp group

भाजपकडून हर्षल साबळे यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा — १८ दिग्गजांना मागे टाकत “सामान्य युवक कार्यकर्ता” अग्रस्थानी; नामांकन अर्ज दाखल

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर : १७ नोव्हे.२५ : मूर्तिजापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपने अखेर उमेदवारीचा गुलदस्ता उघडत हर्षल साबळे यांच्या नावावर भरोसा दाखविला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत भाजपकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. या निर्णयानंतर शहरातील राजकीय वातावरण तापले असून निवडणुकीची लढत आता एका नव्या टप्प्यात प्रवेशली आहे.

आज दुपारी साबळे यांनी शेकडो भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दणदणीत शक्तीप्रदर्शन करत नामांकन अर्ज दाखल केला. मूर्तिजापूरच्या मुख्य मार्गांवर निवडणुकीची धामधूम अनुभवायला मिळाली.

१८ दिग्गजांच्या स्पर्धेतून ‘सामान्य कार्यकर्त्याची’ निवड — पक्षातील समीकरणांना नवा टर्न

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हर्षल साबळे यांनी दिलेले राजकीय व्यक्तव्य विशेष लक्षवेधी ठरले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले—

“या वेळेस पक्षातल्या १८ दिग्गज नेत्यांनी उमेदवारीसाठी आवेदन दिले होते. मात्र पक्षाने त्यांना नाकारून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास दाखवला. ही निवड म्हणजे भाजपमध्ये कार्यकर्त्याला दिले जाणारे महत्त्व, पारदर्शकता आणि संघटनशक्तीची खरी ओळख आहे.”

त्यांनी पुढे म्हटले—
“मूर्तिजापूरचा विकास, स्वच्छ प्रशासन आणि जनतेपर्यंत थेट पोहचणारी कार्यसंस्कृती हा माझ्या कामाचा केंद्रबिंदू राहील. पक्षाने दाखवलेल्या विश्वासाची जपणूक मी प्रामाणिकपणे करणार आहे.”

शहरात राजकीय प्रतिक्रिया — भाजपचा गेमप्लॅन बदलला?

भाजपने बड़े नेत्यांपेक्षा तरुण आणि सक्रिय कार्यकर्त्यावर विश्वास ठेवत नवा राजकीय संदेश दिल्याचे विश्लेषकांचे मत आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये प्रस्थापित नेत्यांच्या नावांची चर्चा असताना अचानक हर्षल साबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने भाजपने “युवा-चेहरा” आणि “मैदानावर उतरलेला कार्यकर्ता” या संकल्पनेवर भर दिला असल्याचे दिसते.

विरोधकांतही या निर्णयानंतर खळबळ उडाली असून निवडणुकीत भाजपचा डाव नेमका काय असेल याबाबत चर्चा रंगू लागली आहे. काहींनी या उमेदवारीकडे “भाजपची अंतर्गत संतुलन साधण्याची रणनीती” म्हणून पाहिले, तर काहींनी “नव्या नेतृत्वाला संधी” असे संबोधले.

शक्तीप्रदर्शनातून निवडणूक मोहीम जोरात

नामांकनाच्या दिवशी झालेल्या शक्तीप्रदर्शनातून हर्षल साबळे यांची संघटनातील पकड आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा स्पष्टपणे दिसून आला. महिलांचा, युवकांचा आणि विविध सामाजिक घटकांचा मोठा सहभाग विशेष ठरला.

आगामी दिवसांत भाजप बाजूने जोरदार प्रचार मोहीम सुरू होण्याची चिन्हे असून विरोधकांसाठी ही उमेदवारी मोठे आव्हान ठरू शकते.

मूर्तिजापूर नगरपरिषद निवडणुकीची लढत आता अधिकच चुरशीची होणार हे निश्चित!


Share

Leave a Comment

error: Content is protected !!