Join WhatsApp group

जिल्ह्यातील १२७ महिलांचा सन्मान करण्याचा संकल्प भाजपाने करून एक नवीन इतिहास केला निर्माण

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक 08 : अकोला : समाज आणि राष्ट्र निर्माण परिवाराच्या कल्याण सोबत मानवता आणि संस्कृतीचे जतन करण्याचे काम मातृशक्ती करत असल्यामुळे व देशांमध्ये परिवर्तन विकास यामध्ये महिलांचा चा प्रत्येक क्षेत्रामध्ये योगदान उल्लेखनी असल्यामुळे व सनातन धर्मामध्ये मातृ शक्तीला आई व दृष्टांचा सहार करणारी करणारी विविध पद व यशस्वीरित्या काम करणारी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार स्थापनेमध्ये व महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आणण्यामध्ये महत्त्वाची भूमिका असणाऱ्या लाडकी बहिणीचा सत्कार करणे हे कर्तव्य असून जागतिक महिला दिवसाच्या औचित्य साधून जिल्ह्यातील 127 महिलांचा सन्मान करण्याचा संकल्प भाजपाने करून एक नवीन इतिहास निर्माण केल्याचे प्रतिपादन कमल सखी मंचाच्या नेत्या सौभाग्यवती सुहासिनी ताई संजय धोत्रे यांनी केले.

भाजपा कार्यालया विविध क्षेत्रातील व संघटनेमध्ये काम करणारे संघटना विस्तारामध्ये समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणाऱ्या 127 मातृ शक्तींचा सत्कार समारंभात ते त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मंजुषाताई रणधीरसावरकर हे होत्या. नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या महिला भाजप कार्यकर्त्यांच्या उल्लेखनीय प्रयत्नांचा सन्मान करण्यासाठी अकोला भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) वरिष्ठ नेतृत्वाने श्रीमती सुहासिनी ताई धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली महिला दिन निम्मित विशेष सत्कार समारंभ आयोजित केला.

समाजातील सर्व स्तरातील महिला विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व त्यांचा परिचय नवीन पिढीला व्हावा व संघटना सोबत परिवार व्यवसाय तसेच सामाजिक दायित्व पूर्ण करून सामाजिक आयाम निर्माण करणाऱ्या महिला आदर्श असल्याची प्रतिपादन, मंजुषाताई सावरकर यांनी केले.अकोला जिल्हा कार्यालयातील भाजप कार्यालय येथे झालेल्या या कार्यक्रमात जिल्ह्यातील प्रमुख महिला नेत्यांची उपस्थिती होती,

ज्यांनी तळागाळातील स्तरावर पक्षाची व्याप्ती बळकट करण्यासाठी महिला कार्यकर्त्यांचे समर्पण, कठोर परिश्रम आणि अतूट वचनबद्धतेचे कौतुक केले.

मतदार जागरूकता मोहिम घरोघरी पहुचोण्यात आणि संघटनात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागासाठी, पक्षाच्या प्रचंड यशात लक्षणीय योगदान दिल्याबद्दल महिला कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.वरिष्ठ महिला नेत्यांनी महिला कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली, पक्षाच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेतली आणि त्यांना प्रमाणपत्रे आणि शाल देऊन सत्कार केला.

आपल्या प्राथमिक सदस्यत्व कार्यक्रमात 500 हून अधिक नागरिकांना जोडण्यासाठी कठोर परिश्रम घेतलेल्या महिला कार्यकर्त्यांनाही पक्षाने सत्कार केला.

नेतृत्वाने राजकारणात महिलांच्या सहभागाचे महत्त्व व मजबूत आणि सर्वसमावेशक समाजासाठी पक्षाच्या दृष्टीकोनाला आकार देण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली|महिला सक्षमीकरणाप्रती भाजपाची बांधिलकी आणि लोकशाही प्रक्रियेत महिला कार्यकर्त्यांना दिलेल्या अमूल्य योगदानाची मान्यता याचा पुरावा म्हणून हा सन्मान सोहळा पार पडला.

आमदार रणधीर सावरकर,पालकमंत्री नामदार आकाश फुंडकर , खासदार. अनुप धोत्रे , आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकले, आमदार वसंत खंडेलवाल किशोर पाटील जयंत मसने, विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील सौ. सुहासिनी ताई धोत्रे, सौ. समीक्षा ताई धोत्रे, सौ. मंजुषा ताई सावरकर, सौ. नलिनी ताई भारसाकळे, सौ. पुष्प ताई खंडेलवाल, सौ. नूतन ताई पिंपळे, सौ. अर्चना ताई शर्मा, सौ. अर्चना ताई मसने, सौ. वैशाली ताई निकम, सौ. चंदा ताई शर्मा, सौ. सुलभा ताई सोळंके, सौ. सुनीता ताई अग्रवाल, सौ. सीमाताई मांगटे पाटील यांच्या उपस्तीथीत मध्ये हा कार्यक्रम उत्साह ने संपन्न झाला.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!