Join WhatsApp group

काँग्रेसला अकोल्यात मोठा धक्का – व्यापारी सेलचे अध्यक्ष पंकज राठी यांचा भाजपमध्ये प्रवेश!

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला – येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्याच्या राजकीय पटलावर मोठी हालचाल पाहायला मिळाली आहे. अकोला जिल्हा काँग्रेस व्यापारी सेलचे अध्यक्ष आणि युवा उद्योजक म्हणून प्रसिद्ध असलेले पंकज राठी यांनी काल भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेतला.

त्यांच्या प्रवेशामुळे भाजपला व्यापारी वर्गामध्ये मोठी ताकद मिळाल्याचे मानले जात आहे.माननीय आमदार रणधीर सावरकर, माजी महापौर विजय अग्रवाल, ज्येष्ठ नेते जयंत मसने आणि आनंद बलोदा, रणजीत खेळकर यांच्या हस्ते पंकज राठी यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी राठी यांच्यासोबत काँग्रेसचे काही कार्यकर्तेही लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली.

गौरक्षण रोडवर झालेल्या या भव्य कार्यक्रमाला शेकडो भाजप कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. घोषणाबाजी आणि जल्लोषाच्या वातावरणात हा कार्यक्रम रंगला.

कोण आहेत पंकज राठी?

अकोला इंडस्ट्रियल असोसिएशन – कार्यकारी सदस्य

रेड क्रॉस सोसायटी – कार्यकारी सदस्य

महाराष्ट्र चेंबर असोसिएशन – कार्यकारी सदस्य

अखिल माहेश्वरी राठी परिवार – महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष

मास्टर ऑफ केमिकल इंजिनिअरिंग पदवीधर

महाराष्ट्रभर ओळख असलेले यशस्वी युवा उद्योजक विविध व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी अनेक पुरस्कारांचे मानकरी.

पंकज राठी यांचा भाजपमध्ये प्रवेश हा केवळ एका पक्ष बदलाचा प्रसंग नसून, आगामी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेससाठी इशारा ठरू शकतो, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. भाजपच्या रणनीतीला व्यापारी वर्गाचा मजबूत आधार मिळाल्याने अकोल्यातील राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ होण्याची शक्यता आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!