Join WhatsApp group

सावधान! डेंगुचे सदृश नवीन वायरस घालत आहे हैदोस? आपल्या बालकांची घ्या काळजी डॉ.सुदीप इंगळे यांचे आव्हान

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर – शहरासह तालुक्यात डेंगूसदृश्य व्हायरसने थैमान घालण्यास सुरुवात केली असून, विशेषत: बालकांमध्ये या तापाचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहे. शासकीय दवाखान्यांपासून ते खाजगी दवाखान्यांपर्यंत रुग्णांची प्रचंड गर्दी होत आहे.

मात्र तपासणीसाठी येणाऱ्या बहुतेक रुग्णांचे डेंगू चाचणी अहवाल निगेटिव्ह येत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या आठवड्याभरात अनेक लहान मुलांना उच्च ताप, अंगदुखी, अशक्तपणा, डोळ्यांत जळजळ व अंगावर लालसर पुरळ यांसारखी डेंगूसदृश्य लक्षणे दिसू लागली आहेत.

चाचण्या निगेटिव्ह येत असल्याने वैद्यकीय अधिकारी सुद्धा गोंधळलेले आहेत. सकाळपासून सायंकाळपर्यंत तापाच्या रुग्णांची तपासणी सुरू असते. “लहान मुलांचे प्रमाण चिंताजनक आहे, या साठी पालकांनी अधिक काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे,” असे काही खाजगी अनेक डॉक्टरांचे मत आहे.

डॉक्टर सुदीप इंगळे (चंद्रभागा क्लिनिक, डे केअर सेंटर, मुर्तिजापूर) यांनी सरकार माझा न्यूजला सांगितले की,“सध्या डेंगूची भीती असली तरी तपासण्या निगेटिव्ह येत आहेत. त्यामुळे हा नवा प्रकारचा व्हायरल फीवर असण्याची शक्यता आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात. ताप आल्यास विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, डास जाळीचा वापर करावा, पाणी साचू देऊ नये व पूर्ण कपडे परिधान करावेत.” उघड्यावरचे खाणे टाळावे, पाणी उकडून प्यावे.

एकूणच, मूर्तिजापूर शहर व तालुक्यात अचानक वाढलेले डेंगूसदृश्य रुग्ण आरोग्य विभागासाठी डोकेदुखी ठरत असून, नागरिकांमध्येही भीतीचे सावट दाटले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!