Join Whatsapp

अपघात ग्रस्तांना आमदार बच्चू कडूं यांची मदत प्रहार पदाधिकारी यांनी रुग्णालयात केले दाखल

Photo of author

By Sir

Share

प्रेमराज शर्मा – मुर्तीजापुर – ५ नोव्हेंबर २४ – प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू हे आज मुर्तीजापुर दौऱ्यावर असताना मुर्तीजापुर वरून पिंजर दिशेने जात असताना त्यांनी अपघातग्रस्तांना मदत करून तीन लोकांचा जीव वाचवला आहे.

जनसामान्यांचे नेते आमदार बच्चू कडू हे आज मुर्तीजापुर मतदारसंघात प्रहार जनशक्ती पक्षाचे पुरस्कृत उमेदवार रवी राठी यांच्या प्रचारासाठी आले असता आज मूर्तिजापूर वरून पिंजर दिशेने जात असता आमदार बच्चू कडू तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे पुरस्कृत उमेदवार रवी राठी यांनी, महामार्गावर टू व्हीलर घेऊन पिंजर वरून मुर्तीजापुरच्या दिशेने जात असलेल्या टू व्हीलर वरील अपघातात गंभीर जखमी झालेल्या रविंद्र योगीराज ईगळे जांभा वय (४८)मंगला रविंद्र ईगळे (४५) शुभम वाणखडे (६) या तिघांना आपल्या गाडीत दाखल करून त्यांना मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून आमदार बच्चू कडू तथा रवी राठी यांनी आपल्या माणुसकीचे दर्शन समोर आणले आहे यावेळी अपघातग्रस्ताच्या नातेवाईकांनी आमदार बच्चू कडू ,रवी राठी यांचे आभार मानले सध्या हा व्हिडिओ संपूर्ण सोशल मीडियावर प्रसारित होत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!