Join WhatsApp group

५० हजारांची लाच घेताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अटक

Photo of author

By Sarkarmzanews

Share

पोलीस खात्यातील भ्रष्टाचारावर कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी धडक दिली आहे. अकोला जिल्ह्यातील दहीहंडा पोलीस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) भागवत कांबळे यांना ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

तक्रारदाराने दाखल केलेल्या गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी कांबळे यांनी सुरुवातीला एक लाख रुपयांची लाच मागितली होती. चर्चा आणि तडजोडीनंतर लाच ५० हजार रुपयांवर ठरली. मात्र, तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत अकोला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली.

तक्रारीनंतर एसीबीच्या पथकाने पोलिस उपअधीक्षक मिलिंद बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली कासली फाट्यावर सापळा रचला. ठरल्याप्रमाणे कांबळे यांनी तक्रारदाराला बोलावून लाच घेतली आणि त्याच क्षणी एसीबीच्या पथकाने त्यांना पैशांसह रंगेहाथ पकडले.

विशेष म्हणजे, ही कारवाई त्या वेळेस झाली, जेव्हा अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि वरिष्ठ अधिकारी कावळ यात्रेच्या तयारीची पाहणी करून नुकतेच त्या भागातून निघाले होते. त्यांच्या उपस्थितीत भ्रष्टाचार रोखण्याचे प्रयत्न सुरू असतानाच, ही घटना उजेडात आल्याने पोलिस खात्यात खळबळ माजली आहे.

पोलीस उपअधीक्षक मिलिंद बहाकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “कोणताही सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी कामाच्या बदल्यात लाच मागत असल्यास, संबंधिताने तात्काळ एसीबीशी संपर्क साधावा.”


Share

Leave a Comment

error: Content is protected !!