Join WhatsApp group

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावतीचा थरारक सापळा — भ्रष्टाचाराला दिला चोख प्रत्युत्तर, पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला लिपिक ₹८,००० लाच घेताना रंगेहात पकडली!

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला : दि. 06 नोव्हेंबर 2025 : राज्य सरकारने भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा नारा दिल्यानंतरही काही अधिकारी अजूनही “लाचेचेच सरकार” चालवत असल्याचे चित्र पुन्हा एकदा उघड झाले आहे. अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक श्रीमती ममता संजय पाटील (वय 50 वर्षे) या महिला कर्मचाऱ्याला ₹8,000 ची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावतीच्या पथकाने रंगेहात पकडले!

न्यायासाठी गेलेल्या नागरिकालाच लाच मागितली!

तक्रारदार हे धान्य खरेदी-विक्री व्यवसायातील व्यापारी असून, त्यांच्या परवानगीशिवाय झालेल्या धान्य विक्रीबाबत त्यांनी पोलीस अधीक्षक, अकोला यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. चौकशीनंतर अहवाल तयार झाला आणि फाईल पुढे पाठविण्याचे काम श्रीमती पाटील यांच्या हातात आले. मात्र या लोकसेविकेने फाईल “पुढे ढकलण्यासाठी” तक्रारदाराकडे थेट ₹20,000 ची लाचेची मागणी केली. शेवटी तडजोडीअंती ₹8,000 वर “डील” ठरवण्यात आली.

लाचलुचपत विभागाचा शास्त्रशुद्ध सापळा

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती यांच्याकडे तक्रार दाखल होताच वरिष्ठांनी सापळ्याची रूपरेखा आखली.
आज संध्याकाळी 6.29 ते 6.40 वाजेदरम्यान, अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयातील आस्थापना विभागाजवळील जिन्याजवळ, पंचासमक्ष श्रीमती पाटील यांनी लाचेची रक्कम स्वीकारताच त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

कारवाईमागे दक्ष पथक

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्राचे मा. पोलीस अधीक्षक श्री. मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिंद्र शिंदे,पोलीस उपअधीक्षक श्री. सुनिल किनने,
तसेच पोलीस निरीक्षक श्रीमती मीनल निसरे, ज्ञानोबा फड, हवालदार राहुल वंजारी, प्रमोद रायपुरे आणि शैलेश कडू यांच्या सहकार्याने करण्यात आली.

श्रीमती ममता संजय पाटील यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन खदान, अकोला येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की —

“कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी अथवा त्यांच्या वतीने कोणीही लाच मागत असल्यास,
त्वरित आमच्याशी संपर्क साधा. तुमची ओळख गुप्त ठेवली जाईल.”

भ्रष्टाचार हा समाजाचा शत्रू आहे. सामान्य नागरिकाने धैर्याने पुढे येऊन लाचखोरांविरुद्ध आवाज उठवला, तरच शासन यंत्रणा शुद्ध होईल. आजच्या या कारवाईने पुन्हा एकदा हे दाखवून दिले आहे.

“लाच मागणाऱ्याचा हात रंगेहात पकडला जातो, पण प्रामाणिक नागरिकाचा आवाज कधी दाबलाजाणार नाही!” पोलीस अधीक्षक श्री. मारुती जगताप ( लाचलुचपत प्रतिबंधित विभाग, अमरावती -9850488788 )


Share

Leave a Comment

error: Content is protected !!