Join WhatsApp group

बार्शीटाकळी तालुक्यातील जनतेला ‘अनंत’आधार आ.हरिष पिंपळे यांच्याकडून बार्शीटाकळी तालुका कार्यालयीन मंत्रीपदावर अनंत केदारे यांची नियुक्ती.

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक २८: श्याम ठक: बार्शीटाकळी:भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते अनंत केदारे यांची बार्शीटाकळी कार्यालयीन मंत्री पदावर नियुक्ती .मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ हा मुर्तिजापूर व बार्शीटाकळी ह्या दोन तालुके मिळून बनलेला आहे.

ह्या मतदार संघाचे आमदार हरिषभाऊ पिंपळे यांचे निवासस्थान व उपविभागीय कार्यालये मुर्तिजापूर शहरात आहे.

त्यामुळे आमदार साहेबांकडे कामाविषयी जातांना गोर गरीब जनतेचा संपूर्ण दिवस खर्ची पडतो व नाहकच आर्थिक बोजा सहन करावा लागतो नेमकी हीच बाब हेरुन आ. पिंपळे यांनी,मुर्तिजापूर विधानसभा मतदार संघातील जनतेच्या समस्यांचे निराकारण तात्काळ व्हावे .

वैद्यकीय मदत किंवा ईतर कोणतेही काम असो .. नागरिकांना मुर्तिजापूर गाठायची आवश्यकता भासणार नाही .यासाठी भाजपाचे माजी शहराध्यक्ष,माजी उपसरपंच,भाजपाचे निष्ठावंत व धडाधडीचे कार्यकर्ते अनंत केदारे यांची बार्शीटाकळी तालुका कार्यालयीन मंत्री म्हणून नियुक्ती पत्र देवून त्यांच्या कार्याचा यथोचित सत्कार केला आहे.

या निवडी मुळे अनंत केदारे यांच्यावर चहूबाजूंनी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अनंत केदारे यांचा परिचय –

भाजपा महाराष्ट्र राज्य. किसान आघाडी सेलचे विद्यमान सदस्य

अजिंक्य गृप शैक्षणिक संस्था सदस्य.

महाविद्यालयीन जीवनात उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू

माजी गृहरक्षक दल सैनिक

माजी उपसरपंच बार्शीटाकळीमाजी शहराध्यक्ष (भाजप)


Share

Leave a Comment

error: Content is protected !!