Join WhatsApp group

माणुसकीचे उदाहरण! आमदार हरीश पिंपळे यांचे तात्काळ सहकार्य; मुंबईत मृत्यूमुखी पडलेल्या कामगाराचा मृतदेह मूर्तिजापूरला आणला रेल्वेच्या माध्यमातून

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर (दि.२४) – हिरपूर येथील रहिवासी रामा विलास पवार हे आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मुंबईत मजुरीचे काम करत होते.

दुर्दैवाने मुंबईहून परत येत असताना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला.या घटनेमुळे पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

त्यातच मृतदेह मूर्तिजापूरला आणण्यासाठी तब्बल २५ हजार रुपयांचा खर्च येत असल्याने त्यांच्या समोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले.

ही बाब आमदार हरीश पिंपळे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधून मृतदेह रेल्वेमार्गे मूर्तिजापूरला आणण्याची व्यवस्था केली.

यासोबतच, आमदार पिंपळे यांनी पवार कुटुंबाला दहा हजार रुपयांची आर्थिक मदतही केली.

या प्रसंगात आमदार हरीश पिंपळे यांनी दाखवलेली तत्परता व माणुसकी अनेकांच्या काळजाला भिडली. सामाजिक बांधिलकीचे भान जपत केलेले हे कार्य जनतेतून व्यापक प्रशंसेस पात्र ठरत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!