Join WhatsApp group

मूर्तीजापूरमध्ये अवैध दारू वाहतुकीवर अकोला स्थानिक गुन्हे शाखेचा ‘प्रहार’!

Photo of author

By Sarkarmzanews

Share

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई – चारचाकीसह देशी व विदेशी दारूचा ५.७० लाखांचा साठा जप्त

मुर्तीजापुर , ०१ जुलै २०२५ –
जिल्ह्यात अवैध दारू धंद्यांविरोधात पोलिसांकडून सुरू असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ मोहिमेंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत मूर्तीजापूरमध्ये अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीला अटक केली असून, सुमारे ५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. अर्चित चांडक यांच्या सूचनेनुसार आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरेपोलीस निरीक्षक श्री. शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही पार पडली.

आज दि. ०१ जुलै २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीवरून मूर्तीजापूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बुब पेट्रोल पंपाजवळ नाकाबंदी करण्यात आली.
यावेळी संशयास्पद चारचाकी गाडी अडवून तपासणी केली असता योगेश अनिल कनोजे (वय ३३, रा. समता नगर, मूर्तीजापूर) याच्या ताब्यात देशी दारूचे १५ बॉक्स व विदेशी दारूचे २ बॉक्स (मूल्य ६९,९२० रुपये) सापडले.
यासोबतच वाहतूक करत असलेली चारचाकी वाहन (कींमती ५ लाख रुपये) जप्त करण्यात आले असून, एकूण मुद्देमालाची किंमत ५,६९,९२० रुपये इतकी आहे.

या प्रकरणी मूर्तीजापूर शहर पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी:
API विजय चव्हाण, पोउनि गोपाल जाधव, GPSI दशरथ बोरकर, HC खुशाल, सुलतान पठाण, PC सतिश, अन्सार, स्वप्रिल आणि गोकुळ चव्हाण यांनी अतिशय प्रभावीपणे कार्यवाही पार पाडली.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!