Join WhatsApp group

अकोला: बेकायदेशीर देशी व विदेशी दारू विक्री करणाऱ्यांवर LCB ची धडक कारवाई

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला | प्रतिनिधी | दि. २४ जुलै

जिल्ह्यात बेकायदेशीर व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) दोन स्वतंत्र कारवायांमध्ये बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली असून जवळपास २ लाख १३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पहिली कारवाई उरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जुना अंदुरा गावात करण्यात आली.गुप्त माहितीवरून LCB पथकाने छापा टाकत गणेश सुभाष कड (२३) आणि उमेश विष्णू भालेराव (३५) यांना अटक केली. त्यांच्याकडून२८ विदेशी दारूच्या बाटल्या (मूल्य ₹२८००)५० देशी दारूच्या बाटल्या (मूल्य ₹२०००)₹९०० रोख₹१०,००० किमतीचा मोबाईल३ मोटारसायकली (किंमत ₹१.८ लाख)असा एकूण ₹१.९५ लाखांचा माल जप्त करण्यात आला.

दुसऱ्या कारवाई मध्ये:

बार्शीटाकळी येथील गजानन मोतीराम जामकर (५२) याला अटक करून त्याच्याकडून९० बाटल्या देशी दारू (किंमत ₹१०,२००)३८ बाटल्या विदेशी दारू (किंमत ₹७,६००)एकूण ₹१७,८०० किमतीचा माल जप्त केला.

सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.ही कारवाई पोलिस निरीक्षक पंकज कांबळे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दशरथ बोरकर यांच्या नेतृत्वाखाली शुभम बोडके, रुक्मिणी घोडके आणि त्यांच्या पथकाने केली.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!