Join WhatsApp group

अखिल भारतीय महिला मंडळाचा सामाजिक उपक्रम ठरला कौतुकाचा विषय पुंडलिक बाबा गो-रक्षण केंद्रात भव्य चारा वितरण कार्यक्रम पार

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर : अखिल भारतीय महिला मंडळाच्या वतीने पुंडलिकबाबा गो-रक्षण केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या चारा वितरण कार्यक्रमाने सामाजिक क्षेत्रात एक सकारात्मक आणि प्रेरणादायी संदेश दिला. गो-सेवा, पर्यावरण संरक्षण आणि समाजातील संवेदनशीलतेच्या जपणुकीसाठी महिला मंडळाचे हे योगदान मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे.

या कार्यक्रमासाठी शहराच्या माजी नगराध्यक्षा सौ. मनालीताई गावंडे यांना विशेष निमंत्रण देण्यात आले होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला औचित्य लाभले.

कार्यक्रमात

  • अध्यक्ष सौ. मीणा गोपाल अग्रवाल
  • कोषाध्यक्ष सौ. डिंपल सागर अग्रवाल
  • सौ. डॉ. रश्मि विक्रम शर्मा
  • सचिव सौ. अभिलाषा सचिन अग्रवाल
  • सौ. ममता सचिन मालानी
    सह महिला मंडळातील सक्रिय सदस्य
    सौ. उमा कैलाश अग्रवाल, सौ. उषा श्यामसुंदर अग्रवाल, सौ. शोभा ओमप्रकाश अग्रवाल, सौ. खुशबू आशीष अग्रवाल, सौ. पूजा गौरव अग्रवाल
    मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या उपक्रमात गोमातांना चारा वितरण करून महिला मंडळाने गो-रक्षणाच्या कार्याला हातभार लावला. शहरात सामाजिक संवेदनशील कार्यांच्या माध्यमातून महिला मंडळ सातत्याने कार्यरत असून, त्यांच्या पुढाकाराचे उपस्थितांनी कौतुक केले.

गो-रक्षण केंद्रातील कार्यकर्त्यांनीसुद्धा महिला मंडळाचे आभार मानत असे उपक्रम नियमित व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या उपक्रमामुळे समाजात सेवा, समर्पण आणि एकात्मतेचा संदेश पसरल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!