Join WhatsApp group

१७ वर्षांनी अखेर स्वप्न साकार! अकोला-पूर्णा मार्गावर पहिली दैनंदिन एक्स्प्रेस सुरू

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला, १९ जुलै :अकोला ते पूर्णा या महत्त्वाकांक्षी ब्रॉडगेज रेल्वे मार्गावर तब्बल १७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पहिली दैनंदिन लांब पल्ल्याची एक्स्प्रेस सुरू होत आहे.

१७६०५/०६ काचीगुडा–भगत की कोठी एक्स्प्रेस ही गाडी २० जुलै २०२५ पासून अकोला-पूर्णा मार्गावर धावणार आहे.

या ऐतिहासिक क्षणासाठी खासदार अनुप धोत्रे यांच्या विशेष पाठपुराव्याला यश आले असून, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या सहकार्यामुळे ही सुविधा प्रत्यक्षात आली आहे.

यापूर्वी माजी केंद्रीय मंत्री संजय भाऊ धोत्रे व खासदार भावना गवळी यांनीही या मार्गासाठी प्रयत्न केले होते.

ब्रॉडगेजच्या परिवर्तनाची दीर्घ वाटचालपूर्वीचा मीटर गेज मार्ग ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ११ नोव्हेंबर २००८ रोजी या मार्गाचे उद्घाटन झाले. त्यानंतर काही स्थानिक पॅसेंजर गाड्या सुरू झाल्या, पण लांब पल्ल्याच्या गाडीची मागणी मात्र अपूर्ण राहिली होती.

२०११ मध्ये काचीगुडा–नांदेड इंटरसिटी एक्स्प्रेस अकोलापर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र तीही नवीन गाडी नव्हती, तर आधीपासून चालू असलेल्या गाडीचे विस्तार होते. त्यामुळे नवीन दैनंदिन एक्स्प्रेसची मागणी कायम होती.

मीनाक्षी एक्स्प्रेस”च्या आठवणींना नवा उजाळा

पूर्वी मीटर गेज मार्गावर धावणारी हैदराबाद–जयपूर “मीनाक्षी एक्स्प्रेस” २००६ मध्ये बंद झाल्यानंतर अनेक भाविक व प्रवासी यांना मोठी गैरसोय सहन करावी लागत होती. तब्बल १९ वर्षांनी आता ही नवीन एक्स्प्रेस त्याच आठवणींना उजाळा देणार आहे.

धार्मिक, सांस्कृतिक व पर्यटक प्रवाशांसाठी मोठा दिलासा

ही गाडी केवळ प्रवासासाठीच नाही तर धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.या गाडीमुळे खालील प्रमुख ठिकाणी जाणाऱ्या भाविकांना लाभ होणार आहे:

महाकाल (उज्जैन), ओंकारेश्वर, मल्लिकार्जुन यांसारख्या शिवधाम दर्शनासाठीश्याम खाटू, सालासर बालाजी, बाबा रामदेव, अजमेर दर्गा, पुष्कर तीर्थजेसलमेर, राणी सती धाम झुंझुनू, नाकोडा तीर्थ, जसोल तीर्थ यांसारखे पर्यटन स्थळे.

मराठवाडा–विदर्भ–दक्षिण भारताला नवा दुवा

ही गाडी महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ तसेच मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा, राजस्थान या राज्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. यामुळे दळणवळण सुलभ होणार असून आर्थिक व सामाजिकदृष्ट्याही या मार्गाचा लाभ होणार आहे.—खासदार अनुप धोत्रे यांचे अभिनंदन, रेल्वे सल्लागार समितीचा सहभागही सेवा सुरू होण्यात रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य ऍड. सुभाषसिंह ठाकूर, ऍड. अमोल इंगळे, उमेश मालू आदींचा मोठा सहभाग असून यात्रिक संघटनांनी त्यांचे तसेच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि खासदार अनुप धोत्रे यांचे अभिनंदन केले आहे.

अकोला व पूर्णा भागातील नागरिकांसाठी ही सेवा एक ऐतिहासिक पर्व ठरणार असून, या मार्गावर दैनंदिन एक्स्प्रेस सेवा स्थिर होऊन भविष्यात आणखी गाड्यांचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!