Join WhatsApp group

अतिक्रमणावर कारवाई की केवळ दिखावा?मूर्तिजापूर नगरपरिषद अधिकाऱ्यांचा अतिक्रमण बाबत दुजोरा भाव; नागरिकांत संमिश्र प्रतिक्रिया

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर (दि.१७जुलै२५) : शहरात गेल्या दोन दिवसांपासून नगरपरिषदेकडून अतिक्रमण विरोधात धडक मोहीम राबवली जात आहे. या कारवाईमुळे काहींनी कौतुकाचे सूर काढले असले तरी अनेक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अतिक्रमणाविरोधातील ही मोहीम केवळ निवडक भागापुरती मर्यादित ठेवली जात असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे.

शहरातील व्यापारी संकुलांमध्ये अतिक्रमणाची परिस्थिती गंभीर असून अनेक व्यापाऱ्यांनी शिड्या, फळके, शेड आणि अन्य साहित्य रस्त्यांवर मांडलेले आहे. अग्रेसन व्यापारी संकुल शिवाजी चौक या व्यापारी संकुलात तर दुकानदारांनी स्विट आउटलेट थेट बाहेर काढले असून पार्किंगची जागा व्यापून टाकली आहे. त्यामुळे ग्राहकांना रस्त्यावरच वाहने उभी करावी लागत असून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

नगरपरिषद अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद

‘सरकार माझा न्यूज’ने या अतिक्रमण काढणाऱ्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की – “शेड लावलेल्या मुळे नागरिकांना थेट त्रास होत नसल्याने व कोणतीही लेखी तक्रार नसल्याने आम्ही ती हटवू शकत नाही.”या विधानावरून अतिक्रमण कारवाईतला दुजोरा भाव उघड झाला आहे.

रेल्वे स्टेशन समोरील व्यापाऱ्यांनीही पक्के शेड उभारले असून रस्त्यावर साहित्य मांडून व्यवसाय सुरू ठेवला आहे. त्यामुळे वाहतूकची समस्या चा त्रास नागरिकांना प्रचंड सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, मूर्तिजापूर नगरपरिषदेच्या समोर असलेले व्यापारी संकुलही अतिक्रमणातून सुटलेले नाही.

राजकीय हस्तक्षेपाचे नागरिकांचे आरोप

नागरिकांनी आरोप केला आहे की अतिक्रमणविरोधी मोहीम ही केवळ दाखवण्यासाठी आहे किंवा विशिष्ट राजकीय दबावामुळे निवडक ठिकाणीच कारवाई केली जात आहे.

त्यामुळे प्रशासनाची निष्पक्षता आणि कारवाईतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!