Join WhatsApp group

सर्पदंश झालेल्या युवा शेतकऱ्याला पिंजर ते अकोला केवळ ४० मिनिटांत दाखल – मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाची तात्काळ कारवाई

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला : निहीदा (ता. बार्शीटाकळी) येथील युवा शेतकरी अतुल बाळू ठाकरे (वय ३०) याला सर्पदंश झाल्याची माहिती पिंजर येथील योगेश आप्पा विभुते यांनी संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दिली.

माहिती मिळताच दीपक सदाफळे यांनी त्वरेने कार्यवाही करत योगेश विभुते यांना सर्पदंश झालेल्या ठिकाणाचा फोटो मोबाईलवर पाठवण्याची विनंती केली. फोटो पाहताच मण्यार जातीच्या सर्पदंशाची शक्यता लक्षात घेऊन, मयुर सळेदार यांच्यासह रुग्णवाहिका तात्काळ रवाना करण्यात आली.

पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. काजल काळे यांनी प्राथमिक उपचार करून रुग्णास अकोला जिल्हा रुग्णालयात तातडीने पाठवण्याचा सल्ला दिला. केवळ ४०-४५ मिनिटांत रुग्णाला अकोला येथे दाखल करण्यात आले.

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्ण आता धोकेमुक्त असल्याचे सांगताच कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला आणि पथकाचे मनःपूर्वक आभार मानले.या संपूर्ण मदतकार्याची माहिती पथकप्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!