Join WhatsApp group

सरकार वर खोटा आरोप लावण्याचा उबाठा चा प्रयत्न

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक २२ – अकोला – अधुरा ज्ञान, अधुरी माहिती वर भाष्य करणे म्हणजे अकलेचे तारे तोडण्यासारखे असून हिंगणी मध्ये जनतेचा पाण्याचा प्रकरण करणारे भाजपा लोकप्रतिनिधीवर आरोप करताना काचेच्या घरामध्ये राहणाऱ्यांनी आरोप करताना विचार करावा असा सल्ला भाजपा महानगर अध्यक्ष जयंत मसने, न्यू तापडिया नगर भागातील माजी नगरसेवक सागर शेगोकार, हरीश काळे यांनी दिला.


देशाचे विकास पुरुष नामदार नितीन गडकरी तसेच महाराष्ट्राचे सर्वसामान्यांची आशास्थान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या मागणीची दखल घेऊन न्यू तापडिया नगर भागातील तसेच शहराच्या विस्तार पाहता उड्डाणपूलच ची मागणी केली व त्यांनी पूर्तता केली ते काम सुरू आहे केवळ गप्पेने काम होत नसते तर त्यासाठी प्रयत्नची पराकाष्टा करावी लागते तसेच आर्थिक तरतूद करावी लागते त्यासाठी खासदार अनुप धोत्रे व आमदार रणधीर सावरकर सातत्याने प्रयत्नशील आहे. उड्डाणपूल उशीर होण्याला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाविकास आघाडी जबाबदार असून त्यांनी त्या काळात निधी दिला नाही.

त्यामुळे काम ला गती मिळाली नाही आपला पाप दुसऱ्यावर लादण्याचा प्रकार करण्यासाठी उबाठासेना तरबेज आहे जिल्ह्यात यासाठी प्रसिद्ध आहे. लोकसभा आणि विधानसभा मध्ये भारतीय जनता पक्षाला अकोला पूर्व मध्ये नेत्र देपक मतदान झालं त्यामुळे इच्छुक व स्वतःला मतदाराची राजा समजणारे व मतदार आपल्या बांधील बांधील आहे असल्याचा प्रकार करणारे नेते त्यांची पोल अकोला पूर्व च्या मतदारांनी केल्यामुळे निराशा पोटी लोकप्रतिनिधी त्या भागातील कार्यकर्त्यांवर आरोप करण्याचा प्रकार व खोट्या प्रसिद्धीसाठी कोणतीही माहिती न घेता अॅप्रोच रोड हा 400 फुटाचा रस्ता असून त्या रस्त्याला पहिले थर टाकण्यात आले आहे त्या थरात मध्ये 10:20 फुटामध्ये भेगा आल्यामुळे आंदोलन करण्यासाठी बहाना करून रस्ता वर अजून पाच वेळ तर येणार आहे त्याची माहिती यांना नाही तांत्रिक माहिती घेतल्याशिवाय केवळ भाजपाच्या दोषापोटी भाजपा विरोधक वेगवेगळे मुखवटे घेऊन जिल्हा आणि महानगरामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला बदनाम करण्याच्या दृष्टीने असा प्रकार करत असले तरी जनता जनार्दन विकासासाठी प्रसिद्ध असलेल्या त्या भागातील नगरसेवक कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते यांच्या पाठीशी उभे आहे.


प्रथम आपण दहीहंडा परिसरामध्ये काय केलं त्याचा अभ्यास करून भाजपा लोकप्रतिनिधीवर आरोप करावा असाही सल्ला भाजपनेते जयंत मसने, यांनी दिलाय यापुढे जर असा प्रकार केल्या त्यांची पोलखोल केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा इशारा देऊन सरकारला बदनाम करण्यासाठी तसेच गडकरी व फडणवीस यांना बदनाम करण्याचा प्रकार सहन केल्या जाणार नाही असा इशारा देऊन न्यू तापडिया नगर उड्डाणपुलाचा संकल्प आमचा आहे आणि त्यासाठी आम्ही निधी आणू आणि काम करू जनतेसाठी न्यू तापडिया नगराच्या विकासासाठी स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांनी सुरुवात केली होती या भागामध्ये ज्या काळात रस्ते नव्हते त्या काळात भाऊसाहेब फुंडकर यांनी निधी देऊन या भागाचा विकास केला होता याची आठवण जयंत मसने, यांनी करून दिली त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये पराजय दिसल्यामुळे असा प्रकार करणाऱ्यांचा प्रकार करणाऱ्याची कीव येत असल्याचाही सागर शेगोकार हरीश काळे जयंत मसने, यांनी म्हटले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!