Join WhatsApp group

मुर्तिजापूर मध्ये रक्तपेढी सुरू व्हावी यासाठी रुग्णसेवकांकडून उपजिल्हा रुग्णालय व आमदार हरीश पिंपळे यांना निवेदन

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर : शहरात अद्यापही रक्तपेढी उपलब्ध नसल्यामुळे अनेक रुग्णांना रक्ताच्या तातडीच्या गरजेसाठी अडचणींचा सामना करावा लागतो आहे. विशेषतः अपघातग्रस्त, गंभीर आजारी रुग्ण, गर्भवती महिला व शस्त्रक्रिया होणाऱ्या रुग्णांच्या जीवावर बेतण्याची वेळ अनेकदा येत असते.

ही समस्या दूर व्हावी यासाठी ब्लड अँड हेल्पर ग्रुप, महात्मा फुले ब्लड ग्रुप व अन्य सामाजिक संस्थांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.

त्याचाच एक भाग म्हणून आज रुग्णसेवकांनी उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर व स्थानिक आमदार मा. हरीशभाऊ पिंपळे यांना निवेदन सादर केले.या निवेदनाद्वारे मूर्तिजापूरमध्ये तातडीने रक्तपेढी स्थापन करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

या निवेदनावर सकारात्मक प्रतिसाद देत आमदार पिंपळे यांनी आवश्यक प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल आणि संबंधित कागदपत्रे लवकरात लवकर सादर करण्याची हमी दिली आहे.

या उपक्रमामुळे लवकरच मूर्तिजापूरमध्ये रक्तपेढी सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ज्यामुळे नागरिकांना भविष्यात रक्ताच्या टंचाईचा सामना करावा लागणार नाही.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!