Join WhatsApp group

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त मूर्तिजापूर मध्ये भव्य आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर | 22 जुलै 2025

महाराष्ट्र राज्याचे तरुण, तडफदार आणि लोकाभिमुख मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त, मूर्तिजापूर शहर व ग्रामीण भारतीय जनता पार्टीतर्फे भव्य आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन माननीय खासदार अनुपजी धोत्रे व माननीय आमदार हरीशभाऊ पिंपळे यांच्या मार्गदर्शनात होत आहे.आरोग्य चाचण्या व रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा आणि गरजू रुग्णांना मदतीचा हात देण्याचा उद्देश या शिबिरा मागे आहे.

🔹 दिनांक: मंगळवार, 22 जुलै 2025

🔹 वेळ: सकाळी 10 ते दुपारी 2

🔹 स्थळ: दुर्गा माता मंदिर, लक्कडगंज, मूर्तिजापूर

या उपक्रमात सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, नगरसेवक, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!