Join WhatsApp group

एक माजी लुटारू नगराध्यक्ष पुन्हा मैदानात! मुर्तीजापुर शहराचा बट्ट्याबोळ पुन्हा होणार का?

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापुर १२ नोव्हे.२५ :मुर्तीजापुर शहराचे राजकारण निवडणुकीचा तोंडावर पुन्हा एकदा तापले आहे. शहराच्या राजकीय रंगमंचावर आता पुन्हा एक ‘जुना चेहरा’ झळकू लागला आहे, आणि तोही असा ज्यांच्या कार्यकाळात शहराचा विकास नव्हे तर ‘विनाश’ झाल्याच्या चर्चाच आजही नागरिक विसरलेले नाहीत!

एक माजी नगराध्यक्ष — ज्यांच्यावर सत्तेचा गैरवापर करून शहर लुटल्याचे आणि पैशाचा वापर करून नगरसेवकांची मतं खरेदी केल्याचे गंभीर चर्चा झाली होती तेच आता पुन्हा एकदा “विकासाचे स्वप्न” मुर्तीजापुर शहराला दाखवत नगराध्यक्ष पदासाठी तयारीला लागले आहेत.

काळ्या पैशाचा माज की विकासाचा नारा?

जर ते माजी नगराध्यक्ष निवडणूकीचा रिंगणात पुन्हा उभे राहिले तर मुर्तीजापुर शहरात “पैशाचा पाऊस पडणार” अशा चर्चांनी वातावरण तापले आहे. राजकीय ध्रुवीकरणाचे खेळ, पैशांचा ओघ, गल्ल्यागल्लीत गप्पांचा विषय या सगळ्यांनी शहरातील राजकारण अधिकच चवदार बनलं आहे.
काही जण म्हणतात, “लोकशाही म्हणजे जनतेचा उत्सव, पण इथे ती काही जणांची ‘कमाईची संधी’ बनली आहे.”

माजी नगराध्यक्षांचा कार्यकाळ – नागरिकांच्या स्मरणात अद्याप ताजा

शहरातील नागरिक सांगतात, त्या कार्यकाळात शहरातील रस्ते खड्डेमय झाले, पाणीपुरवठा व्यवस्था ढासळली, आणि शहरी विकासाचे नाव फक्त कागदावरच राहिले . तरीही आज तेच माजी नगराध्यक्ष पुन्हा जनतेसमोर “विकासाचा मार्ग आम्हीच दाखवू” असा दावा करत उभे राहात आहेत.
पण जनता विचारते — “ज्यांनी आधी लुटलं, त्यांनी आता पुन्हा शहर वाचवायचं? हा विनोद नाही का?”

लोकशाहीचा गैरफायदा, काळ्या पैशाचा राजकारण?

स्थानिक राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी हे माजी नगराध्यक्ष शहरात काळ्या पैशाचा तयार साठा निवडणुकीचा वेळेस जनतेत ओतणार असल्याच्या कुजबुजा सुरू आहेत. काही ठिकाणी मतदारांना व पक्षाचा भावी नगरसेवकांना विविध प्रकारच्या ‘आर्थिक आश्वासनांची पॅकेज’ दिली जात असल्याचे बोलले जात आहे. तर काही भावी नगर सेवक फक्त पक्षाचा फंड करिता या माजी नगराध्यक्षचा मागे आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावध राहण्याची गरज असल्याचे मत समाजातील बुद्धिजीवी वर्गातून व्यक्त होत आहे.

युतीतील अंतर्गत कलह आणि ‘स्वत:चा अस्तित्व वाचवण्याचा खेळ’

राजकीय निरीक्षकांच्या मते, ही सगळी धावपळ एका उद्दिष्टासाठी आहे — “स्वतःचा राजकीय अस्तित्व वाचवणे.”
युतीमध्ये स्थान टिकवण्यासाठी आणि राजकीय पकड कायम ठेवण्यासाठी हे माजी नगराध्यक्ष आता पुन्हा शहरात सक्रीय झाले आहेत.
निवडणुकीत उभे राहून जिवंत राहणं, हेच त्यांचं राजकारण झालं आहे,” असं टोमणे प्रतिस्पर्धी गटातून मारले जात आहेत.

नागरिकांचा सवाल : “शहराच्या विकासाची दिशा कुठे?”

मुर्तीजापुर शहरात नवीन पिढी जागृत झाली आहे. “आता पैशाने नाही, तर कामगिरीने मतं द्या” असं आवाहन काही तरुण मंडळी करत आहेत.
एकीकडे जुन्या चेहऱ्यांचे पुनरागमन, तर दुसरीकडे नव्या नेतृत्वाची हाक — या दोन टोकांवर शहराचं राजकारण सध्या झुलत आहे.


मुर्तीजापुरच्या नागरिकांसाठी ही निवडणूक म्हणजे फक्त नगराध्यक्ष व नगरसेवक निवडणे नाही, तर शहराचं भविष्य ठरवणारा निर्णय आहे.
ज्यांनी शहराचा विकास केला नाही, त्यांनी पुन्हा त्याच नावाखाली सत्ता मिळवावी का, हा प्रश्न आता प्रत्येक मतदारासमोर आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!