Join WhatsApp group

बच्चु भाऊ आले तंत्र फिरवून चालले गेले?

Photo of author

By Sarkarmzanews

Share

प्रेमराज शर्मा – राजकारणात कधी काय होईल याची काही अंदाज नाही असे बरेचशे उदाहरण आपल्याला माहिती आहे. ज्याला निवडणुकीच्या वेळेस तंत्र फिरवता येतात व निवडणूक जिंकल्यानंतर मंत्र देता येतात तेच खरे राजकारणी,

असेच काही झाले आज मुर्तीजापुर बार्शीटाकळी शहरात बच्चुभाऊ कडू रवी राठी यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी व कार्यकर्त्यांना मेळाव्या मधून संबोधण्यासाठी त्यांनी आपले कार्यक्रम मूर्तिजापूर व बार्शीटाकळी येथे आटोपले.

त्यानंतर रवी राठी ला राजकारणात बॅटिंग कशी करायची याचे धडे दिले राजकारणात बॅटिंग करताना फक्त बारा लोकांची टीम लागत नसून दुसऱ्या टीमचे मेंबर पण आपल्या टीम मध्ये कसे सामील होणार याचा डेमो रवी राठी यांना दिला.

बच्चुभाऊंच्या फोनवर काही दुसऱ्या पक्षातील नेते रवी राठी यांच्या संघात सामील होऊन मतदार संघात प्रचार करण्यासाठी येणाऱ्या काही दिवसात दिसणार आहे.

यामुळे त्यांनी जे जे पक्ष सोडले आहे त्या त्या पक्षाचे राजकारणी खेळाडू आता रवि राठी यांच्या संघात भविष्यात दिसणार आहे. आता हे खेळाडू कोण ते समोर येऊन प्रचार करतील का आत मधून आपला काम करतील वेळ पडल्यास सगळं चित्र स्पष्ट होईल.

बच्चुभाऊनी मूर्तिजापूर बार्शीटाकळीचा एकच दौरा करून राजकीय गणित चे सूत्र बदलून दिले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!