Join WhatsApp group

Ads

-

मुर्तीजापुरात ‘बांगलादेशी बाहेर गेल्याचा’ निवडणूक निकालांवर परिणाम? काही प्रभागांतील पारंपरिक उमेदवार पराभूत.

By Sarkarmzanews

December 25, 2025 7:01 pm

Ads

मुर्तीजापुर : दिनांक २५ : मुर्तीजापुर नगरपरिषद काही महिन्या निवडणुकीपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शहरात राबवलेल्या “बांगलादेशी हटाव” मोहिमेचा थेट परिणाम निवडणूक निकालांवर झाल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

निवडणुकीनंतर काही प्रभागांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून निवडून येणारे उमेदवार यावेळी पराभूत झाल्याने या राजकीय चर्चेला अधिक बळ मिळत आहे.

स्थानिक राजकीय निरीक्षक आणि काही पक्ष कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार,
बांगलादेशी नागरिक शहर सोडून गेल्यामुळे काही प्रभागांतील मतांचे गणित बदलले आणि त्यामुळे काही उमेदवार पडले, असा दावा केला जात आहे.

‘मतदारसंख्या कमी झाली’? अशी चर्चा

निवडणुकीचा काही महिन्यानपूर्वी सोमय्या यांनी विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्यानंतर काही भागांत चौकशी, नोटिसा आणि दबाव वाढल्याचे चित्र होते.

त्यानंतर काही कुटुंबे शहरातून निघून गेली का ? अशाचर्चा सध्या स्थानिक पातळीवर सुरु आहे.
याच पार्श्वभूमीवर, “ज्या प्रभागांमध्ये ठरावीक मतदारांवर निवडणूक निकाल अवलंबून होता, तिथेच उमेदवार पराभूत झाले,” असे बोलले जात आहे.

जातीय समीकरण कोसळल्याचा दावा

काही प्रभागांमध्ये वर्षानुवर्षे विशिष्ट जातीय आणि सामाजिक समीकरणांवर निवडणूक निकाल ठरत होते. मात्र यावेळी ती गणिते कोलमडल्याचे दिसून आले.
या मागे बांगलादेशी नागरिक शहराबाहेर गेल्याने मतदारसंख्येत बदल झाला का ?

अधिकृत पुरावे मात्र कुठेच नाहीत

महत्त्वाचे म्हणजे, प्रशासनाकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.

  • किती बांगलादेशी नागरिक होते?
  • किती जणांवर कारवाई झाली?
  • किती लोकांनी प्रत्यक्षात शहर सोडले?
    या प्रश्नांची उत्तरे अजूनही अनुत्तरित आहेत.

भाजपला राजकीय फायदा झाला का?

तर राजकीय वर्तुळात चर्चा आहे कि
‘बांगलादेशी हटाव’चा मुद्दा उचलून वातावरण निर्माण करण्यात आला आणि त्याचा थेट फायदा नगरपरिषद निवडणुकीत झाला.

प्रश्न कायम

मुर्तीजापुरच्या राजकारणात आज एकच प्रश्न चर्चेत आहे—
जर बांगलादेशी बाहेर गेले नसते, तर काही उमेदवार आजही विजयी झाले असते का?

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!