Join WhatsApp group

माध्यमात बातमी, लगेच रेड… पण निष्कर्ष नाही! नागरिकांची मध्ये तीव्र चर्चा?

Photo of author

By Sarkarmzanews

Share

न्यूज डेस्क : (प्रेमराज शर्मा): काटेपूर्णा गावात सुरू असलेल्या ऑनलाईन ‘चक्री’ जुगाराच्या गैरव्यवहाराने संपूर्ण गावात खळबळ उडाली असून, काल एका प्रसार माध्यमातून ही बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी केलेली कारवाई केवळ दिखाऊ तर नव्हती ना? असा थेट प्रश्न उपस्थित होत आहे.

गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती काही पैशाच्या लालसे पोटी हा ऑनलाईन चक्रीचे दुकान चालवत असल्याची चर्चा असून, बोरगाव मंजू येथील कथित मालक गावंडे यांचा या रॅकेटमधील खरा खेळ काय? याबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

माध्यमात बातमी प्रसारित होताच घाईघाईने पोलिस रेड टाकण्यात आली, मात्र “काहीही सापडले नाही” असा निष्कर्ष देत प्रकरण थंड करण्याचा प्रयत्न झाला का? अशी शंका गावकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या ऑनलाईन जुगाराच्या धंद्याची माहिती स्थानिक पोलिसांना नव्हती का? की माहिती असूनही डोळेझाक केली जात होती? यामुळे ठाणेदार अनिल गोपाल यांच्या भूमिकेवर संशयाची सुई फिरत आहे.

जर सर्व काही कायदेशीर होते, तर अचानक रेड का?आणि जर बेकायदेशीर होते, तर ठोस कारवाई का झाली नाही?

काल झालेली पोलिस रेड आज गावात चर्चेचा मुख्य विषय ठरली आहे. “रेड झाली, पण निष्कर्ष शून्य” हे चित्र अनेक शंकांना जन्म देणारे आहे.

ऑनलाईन चक्रीसारख्या जुगाराच्या माध्यमातून तरुण पिढीला कमी वेळात जास्त पैसे कमावण्याचे आमिष दाखवले जात असून, यामुळे युवकांचे भविष्य अंधारात जात आहे, याची जबाबदारी ठाणेदार अनिल गोपाल की वरिष्ठ कोण घेणार?

गावातील पालक वर्गात तीव्र अस्वस्थता आहे. प्रशासनाने वेळीच ठोस पावले उचलली नाहीत, तर हा जुगाराचा विळखा आणखी घट्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणात स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ठाणेदारांच्या भूमिकेचा आढावा घेण्याची जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.

काटेपूर्ण्यातील ऑनलाईन चक्री प्रकरण हे केवळ एका दुकानापुरते मर्यादित नसून, यामागे मोठे जाळे कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

आता प्रश्न एवढाच आहे — बोरगांव पोलिस खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचणार की हे प्रकरणही ‘रेडपुरते’च मर्यादित राहणार?


Share

Leave a Comment

error: Content is protected !!