Join WhatsApp group

मुर्तीजापूरमध्ये रेशन दुकानातील गैरव्यवहाराचा व्हिडिओ व्हायरल; पुरवठा विभागाचा मौन सवाल निर्माण करणारा

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर : दिनांक ११ : मुर्तीजापूर शहरात एका रेशन दुकानातील किरकोळ माल एक तथाकथित रेशन माफियाला गुप्तपणे विकल्या जात असल्याचा संशय व्यक्त करणारा व्हिडिओ गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नागरिकांमध्ये या प्रकाराबाबत व्यापक चर्चा रंगली असून सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराला चाप बसणार की नाही, याविषयी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यवहाराबाबत शहरातील नागरिकांनी पुरवठा विभागाकडे तक्रारी दाखल झाल्याचे सांगितले. मात्र, संबंधित रेशन दुकानदार आणि कथित रेशन माफिया या दोघांवरही अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे.

स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, “जर पुरवठा विभागाकडे व्हिडिओचा पुरावा असूनही कारवाई होत नसेल, तर या सगळ्या प्रकारामागे कोणाचे संरक्षण आहे? प्रशासन माफियांचे माकड-जाळ तर बनले नाही ना?” अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सार्वजनिक वितरण प्रणाली ही गरीब आणि गरजू नागरिकांसाठी असताना, अशा प्रकारचे व्यवहार उघडकीस येणे ही गंभीर बाब मानली जात आहे. संबंधित प्रकरणाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी सुरू करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

पुरवठा विभागाकडून या संदर्भात अधिकृत प्रतिक्रिया येणे बाकी आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!