Join WhatsApp group

कान्हेरी सरपचा राहुलचा हृदयस्पर्शी क्षण; रक्तातून रेखाटलं ‘भाऊ’चं चित्र – आमदार पिंपळे यांचे अश्रू अनावर

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर : २१ नोव्हेंबर २५ : मुर्तीजापूर तालुक्यातील कान्हेरी सरप गावात आज असा प्रसंग घडला की पाहणाऱ्यांच्या डोळ्यांतही पाणी दाटून आलं. गावातील युवक राहुल गायकवाड यांनी स्वतःच्या रक्तातून आमदार हरीश पिंपळे यांचे चित्र रेखाटून “भाऊप्रेम” व्यक्त केले.

हा क्षण पाहून त्याक्षणीभावनांची लाट उसळली.

राहुल भावूक स्वरात म्हणाला—“गावासाठी भाऊंनी केलेल्या विकासकामांचा मी स्वतः साक्षीदार आहे. आमच्या अडचणीत त्यांनी कधीच पाठ फिरवली नाही. त्यांच्या उपकाराची परतफेड करण्यासाठी माझ्याकडून जे शक्य होतं ते मी केलं. हे प्रेम आहे… त्याग नाही.”राहुलचा हा हृदयस्पर्शी उपक्रम पाहताच आमदार हरीश पिंपळे क्षणभर स्तब्ध झाले. डोळ्यांत अश्रू जमा झाले.

आमदार हरीश पिंपळे यांनी थरथरत्या आवाजात सांगितलं—“राहुल… तुझं प्रेम शब्दांच्या पलीकडचं आहे. पण रक्त अमूल्य आहे. ते एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी वापर. मला तुझं आरोग्य जास्त महत्त्वाचं आहे.”भावनांचा हा क्षण अधिक जिवंत बनवणारी गोष्ट म्हणजे या वेळी गावातील मान्यवरही प्रत्यक्ष हजर होते.

त्या वेळी डॉ. रवी कोकाटे, शिवा भोंगरे, राम पाटील, हरीश वाघ हे गावातील प्रमुख नागरिक उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत हा प्रसंग अधिकच हृदयस्पर्शी ठरला.

कान्हेरी सरपमध्ये या घटनेची मोठी चर्चा असून राहुलच्या या अनोख्या प्रेम प्रदर्शनाने गावात भावूक वातावरण निर्माण झाले.भाऊप्रेमाचे रक्तातून उमटलेले हे चित्र आज संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!