Join WhatsApp group

ग्राउंड रिपोर्ट : प्रभाग क्रमांक १ मध्ये सामाजिक मतांच्या ध्रुवीकरणात प्रभाग १ अडकला; विकासाचा मुद्दा गायब!

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तीजापूर : (डॉ. विनोद पुंडगे प्रतिनिधी) : नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मध्ये यंदाचा संपूर्ण राजकीय पटच उलटा फिरल्याचे चित्र दिसत आहे. विकासकामांवर चर्चा शून्य; तर सामाजिक मतांच्या ध्रुवीकरणावर जोर देत उमेदवारांनी रणसंग्राम तापवला आहे. या प्रभागाची राजकीय दिशा विकासाऐवजी सरळ सामाजिक गणितांवर वळली असून मतदारांतही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.


जुन्या नगरसेवकांची ‘पाडण्याची राजकारण’ मोहीम?
जुन्या नगरसेवकांभोवतीही कुजबुज वाढली असून काही जण शक्यता असलेल्या उमेदवारांना रोखण्यासाठी पडद्यामागून ‘विघातक राजकारण’ करीत असल्याची वातावरणातील चर्चा वेग घेतेय. थेट अर्ज न भरता, परंतु पडद्यामागून समीकरणे बिघडवून स्वतःचे वर्चस्व टिकवण्याचा काहींचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

अस्तित्व टिकवण्यासाठी काही उमेदवारांची झुंज
काही उमेदवारांची ही लढाई विकासाच्या अजेंड्यावर नसून फक्त राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी असल्याचे चित्र लोकांमध्ये आहे. प्रचारामध्ये विकासावरील चर्चा, प्रभागातील मूलभूत सुविधा, रस्ते, निचरा, पाणी अशा प्रश्नांचा पूर्ण अभाव… उलट सामाजिक समीकरणे, गटबाजी आणि व्यक्तिगत पातळीवरील टोकाचे आरोप-प्रत्यारोप याचाच बोलबाला. हि निवडणूक राजकीय नसून वैयक्तिक झाल्यचे चित्र सध्या दिसत आहे.

मतदारांमध्ये शिक्षणाचा कमी स्तर पैशाचे राजकारण वाढते
या प्रभागात शिक्षणाचा स्तर इतर भागांच्या तुलनेत कमी असल्याने पैशांच्या आधारे मत मागण्याचे आणि मत फिरवण्याचे प्रकार जास्त प्रमाणात दिसत असल्याची ग्रामस्थांत चर्चा आहे. काही गटांकडून पैशाची उधळण, मतदारांना तात्पुरत्या ‘सुविधा’ दाखवण्याची स्पर्धा आणि मतांचे कच्चे मोजमाप — या सर्वामुळे प्रभागाचा खरा प्रश्न बाजूला पडतोय.

सामाजिक मतांमुळे प्रभागाचे हाल
विकासाचे राजकारण बाजूला सारून सामाजिक मतांचे ध्रुवीकरण केल्याने प्रभाग क्रमांक १ मागासलेलाच राहील, अशी सत्य चित्र आहे. कोणाच्याही बोलण्मया मध्ये विकासाचा ठोस आराखडा नाही, भविष्यातील नियोजन नाही, फक्त मतांचे सामाजिक गणित आणि गोटबाजी.

निवडणुकीत तापलेले वातावरण — पण दिशा नाही!
प्रचारात मोठमोठे दावे, मोठमोठी गर्दी , घराघरांत गाठीभेटी… पण मतदारांपुढे प्रश्न तोच —
प्रभागाचा विकास कोण करणार?
प्रभाग क्रमांक १ मध्ये सामाजिक मतांच्या आहारी गेलेले राजकारण थांबणार का?

प्रभाग क्रमांक १ मध्ये ही निवडणूक विकासापेक्षा सामाजिक समीकरणांची परीक्षा ठरणार, हे चित्र मात्र स्पष्ट झाले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!