Join WhatsApp group

मूर्तिजापूरात आणखी एक राजकीय स्फोट! शर्मा,अरोरा एकत्र शिंदे गटात!

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर : १५ नोव्हे.२५ प्रभाग क्रमांक ९ मध्ये आज असा राजकीय भूकंप झाला की संपूर्ण शहरात चर्चेचा विषय फक्त एकच – शर्मा–अरोरा एकत्र शिंदे गटात!
भाजपने तिकीट नाकारताच गंपू शर्मा यांनी कार्यकर्त्यांच्या कडकडाटात शिंदे गटात केलेला भव्य प्रवेश हा दिवसाचा सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट ठरला.

गंपू शर्मा आता प्रभाग ९ – सर्वसाधारण पुरुष गटातून निवडणूक लढवणार हे निश्चित झाल्याने निश्चित झाले आहे.

बाजोरिया यांची उपस्थिती – प्रवेशाला ‘वजन’ द्यायला पुरेशी!

या भव्य कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते गोपीकिशन बाजोरिया स्वतः उपस्थित राहिल्याने या प्रवेशाला प्रचंड राजकीय वजन प्राप्त झाले.
बाजोरिया यांच्या उपस्थितीनेच शिंदे गटाने प्रभाग ९ मध्ये शक्ती प्रदर्शन करण्याचा मोठा मेसेज दिला आहे, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

दुसरा मोठा स्फोट – लखन अरोरा यांचाही शिंदे गटात प्रवेश!

गंपू शर्मा यांच्या सोबत लखन अरोरा यांनीही शिंदे गटाचा झेंडा हातात घेतल्याने राजकीय वातावरण एकदम तापले.
अरोरा बंधू आणि गंपू शर्मा यांचे एकत्र येणे म्हणजे प्रभाग ९ मधील राजकारणात नवा ‘पॉवर सेंटर’ तयार झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

लखन अरोरा आता महिला ओबीसी मधून कोणाला उभे करता हे पाहणे रोचक ठरणार आहे.

प्रभाग ९ मधील निवडणूक – ‘हाय व्होल्टेज’ होणार निश्चित!

शर्मा – अरोरा – या शक्ती’च्या एकत्रित उपस्थितीने शिंदे गटाने प्रभाग ९ मध्ये वर्चस्वाची नवी लढाई सुरू केल्याचे दिसत आहे.
भाजपच्या तिकीट नाकारण्यामुळे जन्मलेली नाराजी आता शिंदे गटाच्या बाजूने प्रचंड ऊर्जा निर्माण करत आहे.

स्थानिक राजकारणात या दुहेरी प्रवेशानंतर एकच चर्चा –
“प्रभाग ९ मध्ये आता मुकाबला नाही… थेट राजकीय युद्ध!”

निवडणूक चुरशीची, तापलेली आणि सर्वाधिक लक्षवेधी होणार हे आता निश्चित झाले आहे.


Share

1 thought on “मूर्तिजापूरात आणखी एक राजकीय स्फोट! शर्मा,अरोरा एकत्र शिंदे गटात!”

Leave a Comment

error: Content is protected !!